शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

परभणी : १४ योजनांचा वीज पुरवठा केला खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:41 AM

तालुक्यात महावितरणच्या वतीने मार्चएंडच्या तोंडावर वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे़ आतापर्यंत तालुक्यातील १४ पाणीपुरवठ्याची वीज जोडणी तोडण्यात आली आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : तालुक्यात महावितरणच्या वतीने मार्चएंडच्या तोंडावर वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे़ आतापर्यंत तालुक्यातील १४ पाणीपुरवठ्याची वीज जोडणी तोडण्यात आली आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़मानवत तालुक्यामध्ये ४९ ग्रामपंचायती आहेत़ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांकडे वीज बिलाची लाखो रुपयांची थकबाकी आहे़ महावितरणच्या वतीने तालुकाभरात वीज बिल वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे़तालुक्यातील देवलगाव, कोल्हा, रुढी, नरळद, खरबा, हत्तरवाडी, उक्कलगाव, सावरगाव, केकरजवळा, रामपुरी, रामेटाकळी, इटाळी, बोंदरवाडी, कोल्हावाडी, गोगलगाव, आंबेगाव, थार, पिंपळा, जंगमवाडी, आटोळा, मंगरुळ पा़प़, कोथाळा, सारंगापूर तर मानवत विभागांतर्गत येणाºया पाथरी तालुक्यामधील दोन गावांमध्ये सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येतो़महावितरणच्या वतीने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे़ त्याचा फटका वीज बिल थकलेल्या ग्रामपंचायतींना बसला आहे़वीज बिलाचा भरणा न करणाºया खरबा, उक्कलगाव, सावरगाव, केकरवळा, रामपुरी बु़, रामेटाकळी, इटाळी, बोंदरवाडी, कोल्हावाडी, थार, पिंपळा, जंगमवाडी, आटोळा, सारंगापूर या ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा महावितरणने तोडला आहे़ वीज पुरवठा तोडल्याने या गावामध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़या गावातील पाणीपुरवठा योजनेकडे २८ लाख १७ हजार ६२१ रुपये थकले आहेत़ दरम्यान, यापूर्वी वीज पुरवठा तोडलेल्या देवगाव, कोल्हा, रुढी, नरळद, हत्तलवाडी, गोगलगाव, आंबेगाव, मंगरुळ पा़प़, कोथाळा या ग्रामपंचायतींनी काही रक्कम भरून वीज पुरवठा सुरळीत केला आहे़ त्यामुळे या गावांमध्ये सध्या तरी पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे़ मात्र वीज पुरवठा तोडलेल्या गावांमध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़विद्यार्थ्यांना नाहक त्रास : अभ्यासावर परिणाममहावितरणच्या वतीने दरवर्षी मार्च महिन्यातच वीज बिल वसुली मोहीम राबविली जाते़ ग्राहकांकडे अनेक वर्षांची थकबाकी असताना ऐन मार्च महिन्यात वसुली करण्यात येत आहे़ फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये दहावी, बारावी, पदवीच्या परीक्षा घेण्यात येतात़ याच काळामध्ये वीज पुरवठ्याची आवश्यकता विद्यार्थ्यांना असते़ नेमके याच काळात महावितरणच्या वतीने वसुली मोहीम राबविण्यात येत आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे़ वर्षभर महावितरणला वसुली मोहीम राबविण्यासाठी वेळच मिळत नाही का, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांमधून केला जात आहे़ ग्रामस्थांना पाणी मिळावे, यासाठी उन्हाळ्यामध्ये शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च केले जातात़ असे असताना महावितरण पाणीपुरवठ्याची जोडणीही खंडित केली जात आहे़ त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ वर्षभरामध्ये महावितरणने थकबाकी वसुली मोहीम राबविली असती तर ग्राहक व विद्यार्थ्यांनाही फटका बसला नसता़ परंतु, वेठीस धरण्यासाठीच ही कारवाईची मोहीम राबविली जाते की काय, अशी शंका निर्माण होत आहे़सिरकळसचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून बंदताडकळस- पूर्णा तालुक्यातील सिरकळस येथील वीज पुरवठा महावितरणने ३ दिवसांपासून बंद केला आहे़ सिरकळस येथील ११० ग्राहकांपैकी १०३ ग्राहकांकडे थकबाकी आहे़ वीज बिल भरणा न केल्यामुळे संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे़