लोकमत न्यूज नेटवर्कताडकळस (परभणी) : सध्याच्या स्थितीला ज्या पद्धतीने विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. ती प्रगती शास्त्रात आधीपासूनच सुरु झाली होती. विशेष म्हणजे शास्त्राच्या पद्धतीचा आधार घेत विज्ञानाने प्रगती साधली आहे. त्यामुळे माणसाने विज्ञानाबरोबरच शास्त्र पद्धतीचा सुद्धा अवलंब करायला हवा, असे प्रतिपादन श्री.ष.ब्र.सिद्धेश्वलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांनी केले.पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था व अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर सत्संग सोहळा व जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी गडगेकर महाराज बोलत होते. यावेळी माजी खा.तुकाराम रेंगे, डॉ.मदन लांडगे, विठ्ठल रणबावरे, वीरभद्र स्वामी परभणीकर, शिवाजीअप्पा मसुरे, सुभाष शिंदे, मारोती भांगे, महांिलंग कुºहे, बाळासाहेब साखरे, राजू अंबोरे, गणेश अंबोरे, बालाजी रुद्रवार, वामन तुवर, धुराजी होनमने, माणिक लाकडे, मदन अंबोरे, सुरेश मगरे, व्यंकटेश पवार, बाळासाहेब कापसे, रामराव अंबोरे, सुधाकर अंबोरे, रामप्रसाद अंबोरे, नरहरी रुद्रवार, त्र्यंबक अंबोरे, बाळासाहेब राऊत, राजेंद्र मगरे, निरज घोणसीकर आदींची उपस्थिती होती. यावेळी ताडकळस परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पिंपरण येथील भजनी मंडळ प्रथम४याच कार्यक्रमात जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पूर्णा तालुक्यातील पिंपरण येथील स्वरधारा भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावले. रोख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक सरपंच सुनीताताई अंबोरे यांच्या वतीने देण्यात आले. पालम तालुक्यातील फळा येथील संत मोतीराम महाराज भजनी मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावून जि.प.सदस्या इंदुताई अंबोरे यांच्या वतीने ५ हजार १११ रुपयांचे तर सोनपेठ येथील नंदकिशोर भजनी मंडळास गोपाळ अंबोरे यांच्या वतीने ३ हजार १११ रुपयांचे तृतीय पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर विजय साखरे, खंडेराव वावरे, राम रुद्रवार, मनू अंबोरे यांच्या वतीने उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
परभणी : विज्ञानाने केली शास्त्राच्या साहित्यातून प्रगती - गडगेकर महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 1:12 AM