लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील चारही विधानसभेच्या जागा लढविण्याचा निर्णय शनिवारी परभणी येथे झालेल्या बैठकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी दिली.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाची शहरातील सावली विश्रामगृहात नुकतीच बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, पाथरी व गंगाखेड या चारही विधानसभा मतदारसंघातील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमदेवारांची चाचपणी तसेच विधानसभानिहाय संघटन बांधणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच चारही विधानसभा मतदारसंघात मतदारांना बदल हवा आहे. त्यामुळे चारही मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ.बच्चू कडू यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविणारा व सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला चळवळीतील कार्यकर्ता निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील आठवड्यात पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रवीण हेंडवे यांचा जिल्हा दौरा असून त्यांच्यामार्फत सदरील बैठकीचा अहवाल राज्य कार्यकारिणीकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बोधने यांनी दिली. निवडणुकीसंदर्भातील सर्व अधिकार संस्थापक अध्यक्ष आ.बच्चू कडू यांना असून तेच या संदर्भात निर्णय घेतील, असेही बोधने म्हणाले. कार्यकर्त्यांनीही आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटन मजबूत करुन कामाला लागावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.या बैठकीस उपजिल्हाप्रमुख रोहिदास बोबडे, पी.टी.निर्वळ, मारोती पºहाड, भागवत पाटील, कृष्णा टोंपे, दीपक गाणार, हरिभाऊ बोबडे, बाबासाहेब पंढरकर, विलास बोबडे, केशव भुमरे, भगवान काळे, हनुमान बोबडे, अमोल लांडगे, ओंकार गव्हाणे, शिवाजी बोबडे, अनंत काळे, नवनाथ बोबडे आदींची उपस्थिती होती.आॅगस्टमध्ये बच्चू कडू यांचा दौराप्रहार पक्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ.बच्चू कडू हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आॅगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौºयात ते कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. आ.कडू यांनी जिल्ह्यात दिव्यांगाच्या प्रश्नासंदर्भात अनेकवेळा आंदोलने केली आहेत. त्यामुळे त्यांचे जिल्ह्यात अनेक समर्थक आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानसभा निवडणुकीतील भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.विशेष संकल्प अभियानप्रहार पक्षाच्या वतीने पुढील आठवड्यापासून पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टीकोनातून अभियान राबविण्यात येणार असून त्या अंतर्गत ‘गाव तेथे शाखा, घर तेथे प्रहार सैनिक’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येणार आहे.
परभणी: प्रहार पक्ष विधानसभेच्या चारही जागा लढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:25 AM