लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सोमवारी जिल्हाभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात असून येथील पारदेश्वर मंदिरासह बेलेश्वर व इतर शिवालयांमध्ये या उत्सवाची जोरदार तयारी केली जात आहे.पारदेश्वर मंदिरात पारा या धातूपासून बनविलेले शिवलिंग आहे. पारदेश्वर मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जाते. परभणी शहरासह परिसरातील अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. यावर्षी देखील मंदिर संस्थानच्या वतीने शिवरात्री महोत्सवाची तयारी सुरु करण्यात आली आहे. पारदेश्वर मंदिराच्या भव्य अशा कमानीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता ठिकठिकाणी बॅरिकेटस् उभारण्यात आले आहेत. मंदिर परिसराची स्वच्छताही करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ७.३० वाजता मंदिर परिसरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर दिवसभर धार्मिक कार्यक्रम होतील.शोभायात्रेनंतर पारदेश्वरास अभिषेकाला प्रारंभ होईल. दिवसभरातील अभिषेकानंतर रात्री १० ते १२ या वेळेत १००८ महेंद्र सच्चिदानंद स्वामी यांचा सत्संग कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री १२ वाजता पाऱ्याचा अभिषेक केला जाणार आहे. या अभिषेकासाठी २ ते ३ लिटर पारा लागतो. हा पारा हैदराबाद, हरिद्वार येथून मागविला जात असल्याची माहिती देण्यात आली.राज्यातील एकमेव मंदिर परभणीत४सर्वसाधारण वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर पारा हा धातू वितळतो. परंतु, याच पाºयापासून परभणीत शिवलिंग तयार करण्यात आले आहे. हरिद्वार येथे १५१ किलो पाºयाचे शिवलिंग आहे तर दुसरे शिवलिंग परभणी येथे २५१ किलो पाºयापासून बनविले आहे. त्यामुळे परभणीतील पारदेश्वर हे राज्यातील एकमेव पाºयाचे शिवलिंग असलेले मंदिर आहे. प.पू.सद्गुरु महामंडलेश्वर श्री १०८ स्वामी सच्चिदानंद स्वामी महाराज यांनी या मंदिराची स्थापना केली आहे. पाºयापासून बनविलेल्या या शिवलिंगाला रसलिंगही असेही म्हणतात. या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने भाविकांची मनोकामना पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे.
परभणी : महाशिवरात्रीसाठी पारदेश्वर मंदिर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 12:12 AM