लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा विनंती बदली प्रक्रियेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने बदल केला असून, आता अचानकपणे शिक्षकांना सदरील बदली रद्द करता येणार नाही. असे केल्यास त्यांना रुजूही करून घेतले जाणार नाही़जिल्हा परिषद शिक्षकांच्या २४ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयानुसार संगणकीय प्रक्रियेद्वारे आंतर जिल्हा बदल्या करण्यात येत आहेत़ त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षकांची त्यांच्या पसंतीनुसार दिलेल्या जिल्ह्यात बदली झाली असली तरी त्यांनी सदर जिल्ह्यातील बदली रद्द करण्याची विनंती केल्यानंतर त्यांच्या बदल्या रद्द करण्याची परवानगी देण्यात आली होती़ तथापि अंतर जिल्हा बदलीेने स्वत:च्या इच्छेने बदली झाल्यानंतर सदर बदली रद्द करणे म्हणजे अन्य गरजू शिक्षकांवर अन्याय करण्यासारखे आहे़ ही बाब विचारात घेऊन राज्याच्या ग्रामविकास विभागाने याबाबतचे धोरण निश्चित केले आहे़ त्यानुसार आंतर जिल्हा बदली आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षकास ती बदली नको असल्यास सदरील बदली रद्द करण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक महिन्याच्या आत याबाबतचा अर्ज देणे आवश्यक राहील़ एक महिन्यानंतर अशी बदली रद्द करता येणार नाही़ बदली रद्द करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घेताना त्या संवर्गाची जागा रिक्त असल्याची खातरजमा करावी, अशा प्रकारे संवर्गाची जागा रिक्त नसल्यास बदली रद्द करता येणार नाही़ आंतर जिल्हा बदली आदेश रद्द करणे हा संबंधित शिक्षकाचा हक्क नाही़ याबाबत जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा निर्णय अंतीम असेल़ मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या निर्णयाविरूद्ध विभागीय आयुक्तांकडे अपील किंवा विनंती करता येणार नाही. अशा शिक्षकांना नियुक्तीच्या मूळ जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या निवडीच्या प्रवर्गाची रिक्त जागा असल्यास त्यांची मूळ जिल्हा परिषदेत नियुक्ती कायम ठेवण्यात येईल; परंतु, या पुढे आंतर जिल्हा बदलीने झालेली बदली रद्द करून त्यांच्या मूळ जिल्ह्यात परत जाण्याची विनंती करणाºया शिक्षकांना त्यांच्या संवर्गातील सेवाज्येष्ठता गमवावी लागेल़ आंतर जिल्हा बदली रद्द करून जे शिक्षक त्यांच्या नियुक्तीच्या मूळ जिल्हा परिषदेत जातील, अशा शिक्षकांची त्यांच्या नियुक्तीच्या मूळ जि़प़मध्ये फेर नियुक्ती गृहित धरून त्यांना सेवाज्येष्ठतेमध्ये सर्वात कनिष्ठ जागी दर्शविण्यात येईल़, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे़जि़प़ सीईओंनाच बदली रद्द करण्याचा अधिकार४राज्याच्या ग्रामविकास विभागाने २० आॅगस्ट रोजी काढलेल्या आदेशात आंतर जिल्हा बदली रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वस्वी जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाच बहाल केला आहे़ त्यामुळे त्यांचा निर्णय अंतीम असेल़ अनेक वेळा राजकीय हस्तक्षेपातून या संदर्भात काही ठिकाणी दबाव आणल्याचे प्रकार घडले आहेत़४आता मात्र असा राजकीय दबाव सीईओंवर आणता येणार नाही, शिवाय त्यांच्या निर्णयाविरूद्ध विभागीय आयुक्तांकडे अपिलही करता येणार नाही़ परिणामी जि़प़ सीईओंनी दिलेला निर्णय प्रमाण माणून संबंधित ठिकाणी आंतर जिल्हा बदलीतील शिक्षकांना नोकरीला जावे लागणार आहे़पाच वर्षे अर्ज करण्यास मुकणार४जे शिक्षक आंतर जिल्हा बदली झाल्यानंतरही संबंधित ठिकाणी रुजू न होता बदली रद्द करतील़ त्या शिक्षकांना पुढील पाच वर्षाच्या कालावधीत आंतर जिल्हा बदलीसाठी अर्ज करता येणार नाही़ त्यामुळे या शिक्षकांना पाच वर्षे शांत बसावे लागणार आहे़ विशेष म्हणजे त्यांना त्यांची सेवा ज्येष्ठताही गमवावी लागणार आहे़ त्यामुळे या पुढील काळात आंतर जिल्हा बदली केल्यानंतर संबंधित जिल्ह्यात मनाजोगे ठिकाण न मिळाल्यास बदली रद्द करून परत त्याच जागेवर नोकरी करण्याचा मनसुबा बाळगणाºया शिक्षकांची गोची होणार आहे़ ं
परभणी : शिक्षकांना विनंती बदली रद्द करताना येणार अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:34 AM