शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

परभणी : बाजारपेठ बंद ठेवून नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:49 AM

जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी परभणी शहरासह गंगाखेड, जिंतूर तालुक्यातील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला. दहशतवाद्यांना अद्दल घडविसाठी शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी परभणी शहरासह गंगाखेड, जिंतूर तालुक्यातील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला. दहशतवाद्यांना अद्दल घडविसाठी शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले. या घटनेचे पडसाद जिल्हाभरात उमटत आहेत. नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येऊन निषेध व्यक्त करीत आहेत. शनिवारी परभणी शहरात नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. शहरातील सराफा बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. तसेच मोंढा बाजारपेठही दिवसभर बंद ठेवण्यात आली. येथील गांधी पार्क भागात सराफा व्यापाºयांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. रॅली काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.झरीत प्रतिसादतालुक्यातील झरी येथेही सर्व पक्षीय पदाधिकारी आणि व्यापाºयांनी उत्स्फूर्त बंद पाळला. व्यापाºयांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली.बोरीत निषेधजिंतूर तालुक्यातील बोरी येथेही बंदचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविला.येलदरीत बाजारपेठ बंदजिंतूर तालुक्यातील येलदरी येथे शनिवारी बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला. सर्व पक्षीय पदाधिकारी व व्यापाºयांनी बंदचे आवाहन केले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सराफा व्यापाºयांनी नोंदविला निषेध४परभणी जिल्हा सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन अंबिलवादे, उपाध्यक्ष अशोक डहाळे, सुनील दहिवाल, सुरेंद्र शहाणे, रमेश दाभाडे, गोविंद डहाळे, प्रकाश शहाणे , राजेश शहाणे, अमोल पांगरकर, दीपक टाक, संतोष शहाणे, विष्णू शहाणे, विठ्ठलराव शहाणे आदींची उपस्थिती होती.व्यापारी महासंघातर्फे श्रद्धांजली४परभणी जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिवाजी चौकात अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके, नितीन वट्टमवार, संजय मंत्री, नंदकिशोर अग्रवाल, रामू माहेश्वरी, राजेश अग्रवाल, रमेश पेकम, सतीश नारवानी, संकेत अग्रवाल, प्रल्हादराव कानडे, सनी अग्रवाल, सुनील जोशी, अजीत वट्टमवार, सचिन वट्टमवार, राजेंद्र सोनी आदींची उपस्थिती होती.पूर्णा शहरात कडकडीत बंद४दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापारी महासंघाने पुकारलेल्या बंदला पूर्णा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी छत्रपती शिवाजी चौक येथे व्यापारी, राजकीय पक्ष पदाधिकाºयांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बंदमुळे दिवसभर बाजारपेठेत शुकशुकाट होता.गंगाखेड शहरात बंद; मुख्य मार्गावरुन काढली रॅलीगंगाखेड शहरात १६ फेब्रुवारी रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात शहरात दाखल झाला होता; परंतु, बंदच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी हा भाजीपाला विक्री न करता परत नेला. शनिवारी शहरातील मुख्य मार्गावरुन रॅली काढून हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. येथील दिलकश चौक येथून सकाळी ११ वाजता निघालेल्या रॅलीत युवक, व्यापारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शनिवार हा बाजाराचा दिवस असून बाजारासाठी आलेल्या व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवून रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या. तहसील कार्यालयासमोर या रॅलीचा समारोप झाला. यावेळी युवकांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन शहरातील मुख्य रस्त्याने फेरफटका मारत ‘अमर रहे, अमर रहे, भारतीय जवान अमर रहे’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्या. बंदमुळे शहरात विक्रीसाठी आणलेला भाजीपाला शेतकºयांना परत न्यावा लागला. दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आल्याने ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामस्थांची गैरसोय झाली.मानवतमध्ये मदतफेरीत १ लाख ११ हजार जमा४मानवत- पुलवामा घटनेतील शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी शहरातून फेरी काढण्यात आली. यात १ लाख ११ हजार रुपये जमा झाले. शनिवारी सकाळी ११ वाजता महाराणा प्रताप चौक येथून डॉ.अंकुश लाड यांच्या नेतृत्वाखाली ही फेरी काढण्यात आली. यावेळी व्यापारी, नागरिकांना मदतीचे आवाहन केले. शहरातील मुख्य बाजारपेठ, मोंढा आदी भागातून ८१ हजार १२० रुपये, डॉ.अंकुश लाड यांच्याकडून २९ हजार ९९१ रुपये असे १ लाख ११ हजार १११ रुपये निधी जमा करण्यात आला. हा निधी भारतीय सैैन्य दलाच्या वेलफेअर खात्यामध्ये जिल्हाधिकाºयांमार्फत पाठविला जाणार आहे, अशी माहिती अ‍ॅड.अनिरुद्ध पांडे यांनी दिली. या रॅलीत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, नगरसेवक मोहन लाड, दत्ता चौधरी, शिवसेना शहरप्रमुख बालाजी दहे, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रवीण दिनकर, सचिन आहेर, स्वप्नील शिंदे, सचिन कोकर, डॉ.राजकुमार लड्डा, डॉ.योगेश तोडकरी, डॉ.विठ्ठल काळे, डॉ. जगदीश शिंदे, डॉ.सचिन कदम, शेख मुश्ताक, एजाज खान, युनूस कुरेशी, मौलाना अफसर, हाफेज शोएब, मौलाना अलीम, एम.ए. रिजवान, बंटी आहीर, नितीन कुमावत, महेबूब मन्सुरी आदी सहभागी झाले होते. वृंदावन ट्रेडिंगच्या प्रांगणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन