लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने २४ डिसेंबर रोजी परभणीतील कोतवालांनी मुंडण करून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला़परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील कोतवालांनी ७ डिसेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले असून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ७ डिसेंबरपासून कोतवालांनी कामबंद आंदोलन करीत धरणे आंदोलन सुरू केले असताना त्यांच्या मागण्यांकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असून, तोडगा काढण्यासाठी अधिकारी पुढे येत नसल्याने सोमवारी कोतवालांनी मुंडन आंदोलन केले़ या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला़ या आंदोलनात कोतवाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़दरम्यान, या पूर्वीही १७ डिसेंबर रोजी कोतवालांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भीक मागो आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविला होता़
परभणी : मुंडण करून नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:29 AM