लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोरोनामुळे स्थलांतरित झालेल्या कुटूंबियांना रेशनचे धान्य त्वरीत उपलब्ध करून देण्यात यावे, असे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़कोरानामुळे अनेक कुटूंबिय स्थलांतरित झाले आहेत़ या कुटूंबियांकडे रेशनकार्ड नाही़ सद्यस्थितीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणात व दरामध्ये स्थलांतरित कुटूंबियांना धान्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहेत़ तरी देखील शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी न करता अशा कुटूंबियांना धान्य दिले जात नसल्याच्या तक्रारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे अनेक नागरिकांनी केल्या़ त्यानंतर या संदर्भात ११ एप्रिल रोजी थोरात यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून, त्यामध्ये या स्थलांतरित कुटूंबियांना अडचणीच्या काळात मदत करण्याच्या अनुषंगाने रेशनचे धान्य उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच लॉकडाऊनच्या काळात काही किराणा दुकानदार चढ्या दराने मालाची विक्री करीत आहेत़ याबाबतच्याही तक्रारी येत आहेत़ त्यामुळे अशा दुकानदारांवरही कारवाई करावी व गरज लागल्यास नागरिकांसाठी हेल्पलाईन तयार करावी, असेही आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत़
परभणी : स्थलांतरित कुटुंबियांना रेशनचे धान्य त्वरीत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 11:27 PM