शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

परभणी : आज थांबणार जाहीर प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:41 PM

लोकसभा निवडणुकीत १८ दिवसांच्या प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास थांबणार असून, त्यानंतर छुप्या प्रचारावरच उमेदवारांची भिस्त राहणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीत १८ दिवसांच्या प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास थांबणार असून, त्यानंतर छुप्या प्रचारावरच उमेदवारांची भिस्त राहणार आहे़या मतदार संघात शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार खा़ बंडू जाधव, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांच्यासह १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ २९ मार्चपासून या मतदार संघात जाहीर प्रचाराला सुरुवात झाली़ ध्वनीक्षेपक, कॉर्नर बैठका, पदयात्रा, गाठीभेटी आणि स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा असे प्रचाराचे स्वरुप राहिले़ १८ दिवस उमेदवारांनी दिवसरात्र एक करून संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला़ अनेक भागात प्रचाराच्या दोन-दोन फेऱ्याही पूर्ण झाल्या आहेत़ या मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने स्टार प्रचारकांच्या सभांच आयोजन केले होते़ या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभा या मतदार संघात झाल्या़ तर महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री गुलाबराव पाटील आदींच्या सभा झाल्या़ सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही सभा झाली़ तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांची सभा पूर्णा, पाथरी येथे झाली़ या सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या़ त्याच प्रमाणे कॉर्नर बैठकांतून विकास कामावंर चर्चा झडल्या़ त्यामुळे या काळात जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते़यावर्षी उन्हाचे प्रमाण अधिक राहिले़ एप्रिल महिन्यांतील १५ दिवस तापमान ४० अंशाच्या पुढे नोंद झाले़ त्यामुळे राजकीय पक्ष कार्यकर्र्त्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागला़ वाढत जाणारे ऊन लक्षात घेऊन सकाळी ७ वाजेपासूनच प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली जात होती़ ११ वाजेपर्यंत बहुतांश प्रचार फेºया पूर्ण केल्यानंतर दुपारच्या काळात चावडीवरील बैठका, कॉर्नर बैठकांवर भर देण्यात आला़ जाहीर सभांचे नियोजन करतानाही शक्य तो सकाळी किंवा सायंकाळच्या वेळा निवडण्यात आल्या़एकंदर प्रचाराची ही रणधुमाळी आता थांबविण्याची वेळ जवळ आली आहे़ १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जाहीर प्रचाराची मुदत आहे़ त्यामुळे मंगळवारचा संपूर्ण दिवस उमेदवारांकडे शिल्लक असून, या काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न हे उमेदवार करतील़ सायंकाळी ६ नंतर मात्र प्रचार थांबणार आहे़जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, जाहीर प्रचार थांबल्यानंतर उमेदवारांकडे आणखी दोन दिवस शिल्लक आहेत़ या काळात प्रत्यक्ष जाहीर प्रचार करता येणार नसला तरी गाठीभेटी घेणे, मतदारांशी संपर्क वाढवून छुप्या पद्धतीने प्रचार केला जाईल, असा अंदाज आहे़एकंदर निवडणुकीतील प्रचाराचा महत्त्वाचा टप्पा मंगळवारी संपणार असून, उमेदवारांना आता जास्तीत जास्त मतदान करून घेण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे़ तर दुसरीकडे जाहीर प्रचार संपल्याने प्रशासनाची जबाबदारी वाढली असून, पथकांना अधिक सजग करण्यात आले आहे़गाठी भेटीवरच द्यावा लागेल भर४मंगळवार सायंकाळनंतर जाहीर प्रचार थांबणार असल्याने उमेदवार, त्यांच्या कार्यकर्त्यांना जाहीर सभा, पदयात्रा यासारखा प्रचार करता येणार नाही. त्यामुळे मतदारांच्या वैयक्तिक गाठी भेटी घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे या माध्यमातूनच प्रचार करावा लागेल. उमेदवारांकडे दोन दिवस आणि दोन रात्र शिल्लक असून, या काळात किती मतदारांपर्यंत उमेदवार पोहोचू शकतात, यावरच सर्वकाही अवलंबून आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहूनही मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न उमेदवारांना करता येईल.पथकांची वाढली जबाबदारीजाहीर प्रचार थांबल्यानंतर दोन दिवस महत्त्वपूर्ण आहेत. या काळात आचारसंहिता भंग होण्याचे प्रकार होवू शकतात़ त्यामुळे गैरकृत्यांवर नजर ठेवण्यासाठी आचारसंहिता पथकांची जबाबदारी महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्यामुळे या काळात होणाºया हालचालींवर बारकाईने ठेवण्याची भूमिका पथकांना घ्यावी लागेल. दोन्ही दिवशी रात्री गस्त वाढवावी लागणार आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरुन धावणाºया वाहनांचीही कसून तपासणी करावी लागेल.प्रशिक्षणात पथक प्रमुखांना सूचनाआचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी व्हिडीओ सर्व्हलन्स टीम, स्टॅटेस्टिक सर्व्हलन्स टीम यासह प्लार्इंग स्कॉड आणि इतर पथकांची स्थापना करण्यात आली आहे़ या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण झाले आहे़ त्यांची जबाबदारी काय? त्यांनी कुठल्या पद्धतीने काम करावे, याची माहिती प्रशिक्षणा दरम्यान अधिकारी, कर्मचाºयांना देण्यात आली आहे़ मंगळवारी सायकाळी प्रचार थांबल्यानंतर या पथकांची जबाबदारी वाढणार आहे़ या दृष्टीनेही बैठक घेऊन अधिकारी, कर्मचाºयांना सूचना दिल्या जातील, असे निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी सांगितले़

टॅग्स :parbhani-pcपरभणीparabhaniपरभणीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक