शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

परभणी-पुणे 'जलद' रेल्वे धावणार ताशी २७ किलोमीटरने; धीम्यागतीमुळे प्रवाशांमध्ये संताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 1:52 PM

रेल्वे विभागाने प्रवासाचा अवधी १५ तासांवर नेवून पोहचविल्याने परभणीसह नांदेड व या मार्गावरील प्रवाशांच्या गैरसोयीत भर घातली आहे़ 

ठळक मुद्दे रेल्वे गाड्यांचा वेग तासी ६० किमी आहे़ हा वेग प्रतितास वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत मराठवाड्यातील प्रवाशांना मात्र तासी २७ किमी या वेगाने पुणे गाठावे लागणार आहे़ ५५६ किमी अंतरासाठी १५ तास मोजावे लागणार असून, यामुळे रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा होणार आहे़

परभणी : एकीकडे जग गतीमान होत असताना दुसरीकडे दक्षिण-मध्य रेल्वेने त्याच अंतरासाठी जास्तीचे तास देऊन मराठवाड्यातील प्रवाशांवर अन्यायाची भूमिका सुरूच ठेवली आहे़ नांदेड ते पुणे हे ११ तासांचे अंतर असताना रेल्वे विभागाने ते १५ तासांवर नेवून पोहचविल्याने परभणीसह नांदेड व या मार्गावरील प्रवाशांच्या गैरसोयीत भर घातली आहे़ 

दक्षिण-मध्य रेल्वे विभागाकडून मराठवाड्यावर वारंवार अन्याय केला जात आहे़ नांदेडहून पुण्यासाठी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात लूझ टाईम दिला जात आहे़ हा लूझ टाईम  कमी करावा, अशी मागणी होत असताना तो वाढविण्यात आला आहे़ नांदेड ते पुणे हे ५५६ किमीचे अंतर असून, या अंतरासाठी जलद रेल्वेला ११ तासांचा वेळ निर्धारित केला आहे; परंतु, तो आता १५ तासांवर पोहचला असल्याची माहिती मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने दिली आहे़ 

२००५-०६ मध्ये नांदेड-पुणे लातूरमार्गे ११ तासांचा प्रवास निर्धारित करण्यात आला़ त्यानंतर हळूहळू या गाडीला लूझ टाईम वाढविण्यात आला़ १२ तास, १३ आणि आता तर चक्क १५ तास निर्धारित करण्यात आले आहेत़ लातूर रोड ते नांदेड हे १८९ किमी अंतर गाठण्यासाठी ७ तास लागणार आहेत. लातूर रोड ते परळी या ६३ किमीसाठी ३ तास १० मिनिटे लागणार आहेत़ केवळ खाजगी ट्रॅव्हल्स मालकांच्या फायद्यासाठी  हा प्रकार केला जात असल्याचा आरोपही मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे़ गंगाखेड येथून पुण्याला तीन ट्रॅव्हल्स धावतात तसेच एसटी बसची सुविधाही आहे़ नांदेड-पनवेल या रेल्वेला गंगाखेड येथे थांबा देण्याचे टाळले जात आहे़ वारंवार मागणी करूनही या ठिकाणी थांबा दिला जात नाही़ 

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे गाड्यांचा वेग वाढवून प्रवाशांची सुविधा करण्याचे धोरण निश्चित केले असताना दुसरीकडे मात्र नांदेड विभागातील रेल्वे गाड्यांवर सातत्याने अन्याय केला जात आहे़ खाजगी ट्रॅव्हल्स चालकांचे हित जोपासण्याचे धोरण अवलंबिले जात असून, या प्रकाराचा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने निषेध नोंदविला आहे़ महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा़ सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डॉ़ राजगोपाल कालानी, रविंद्र मुथा, संभानाथ काळे, श्रीकांत गडप्पा, प्रवीण थानवी, सुनील जोशी, दिलीपराव दुधाटे, नयना गुप्ता, अनिल देसाई, हर्षद शहा, शंतनु डोईफोडे, उमाकांत जोशी, किरण चिद्रवार, अमीत कासलीवार, रवि रोडे, ओमसिंग ठाकूर, चंदूलाल बियानी आदींनी रेल्वे प्रशासनाच्या धोरणावर टीका केली आहे़ 

तासी २७ किमीने धावणार जलद गाडीमराठवाडा विभाागात सर्वसाधारणपणे रेल्वे गाड्यांचा वेग तासी ६० किमी आहे़ हा वेग प्रतितास वाढविण्यासाठी प्रयत्न होत असताना मराठवाड्यातील प्रवाशांना मात्र तासी २७ किमी या वेगाने पुणे गाठावे लागणार आहे़ ५५६ किमी अंतरासाठी १५ तास मोजावे लागणार असून, यामुळे रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा होणार आहे़ पुण्याबरोबरच लातूर रोड ते नांदेड या अंतरासाठी ७ तास तर लातूर रोड ते परळी अंतरासाठी ३ तास १० मिनिटे एवढा वेळ खर्ची घालावा लागणार आहे़ विशेष म्हणजे भाडेही वाढविण्यात आले आहे़ रेल्वेच्या स्लिपर टिकीटासाठी २८५ रुपयांऐवजी आता ३७५ रुपये म्हणजे एका तिकीटामागे ९० रुपयांचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागणार आहे़ विशेष गाड्यांच्या नावावर प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी महासंघाने केला आहे

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीparabhaniपरभणी