शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

परभणी : सायकल मोहिमेतून मांडले एड्सबाधितांचे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 12:56 AM

एचआयव्ही बाधित अनाथ मुुलांच्या मूलभूत प्रश्नांवर जनजागरण करीत येथील डॉ.पवन चांडक यांनी पुणे- अष्टविनायक-पुणे अशी ७०० कि.मी. अंतराची सायकलवारी कोणत्याही बॅकअप्शिवाय पूर्ण केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: एचआयव्ही बाधित अनाथ मुुलांच्या मूलभूत प्रश्नांवर जनजागरण करीत येथील डॉ.पवन चांडक यांनी पुणे- अष्टविनायक-पुणे अशी ७०० कि.मी. अंतराची सायकलवारी कोणत्याही बॅकअप्शिवाय पूर्ण केली आहे.२५ नोव्हेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानकावरुन डॉ.चांडक यांनी सायकल प्रवासाला सुरुवात केली. थेऊर, जेजुरी, मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड मार्गे पाली येथे ही सायकल यात्रा पोहचली. परतीच्या प्रवासात खापोली, लोणावळा, देहू, आळंदी, धायरीमार्गे ३० नोव्हेंबर रोजी पुणे येथे समारोप झाला. ७०० कि.मी. अंतराच्या सायकल प्रवासात चांडक यांनी पुणे, अहमदनगर, नाशिक, अलीबाग या चार जिल्ह्यातून सह्याद्रीच्या पर्वतरांगातून अवघड असलेले रस्ते, खंडाळा घाट मार्गाने प्रवास केला. या दरम्यान विविध सामाजिक संस्था, सायकलग्रुप, रोटरी क्लब, आनंदवन, सोमनाथ श्रमसंस्कार शिबिरार्थी मित्र परिवार आदींच्या वतीने आयोजित एडस् जनजागृती कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केले. एडस्बाधित बालकांच्या पुनर्वसनासाठी मदतीचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. २८ नोव्हेंबर रोजी खालापूर पंचायत समिती येथील बचतगट सदस्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला. २९ नोव्हेंबर रोजी पालवाला महाविद्यालयात रासेयोच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याच दिवशी पिंपरी चिंचवड येथे पोहचून निसर्ग सायकलमित्र ग्रुपच्या सदस्यांशी संवाद साधला. इन्डो सायलिस्ट क्लबच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.विविध ठिकाणी जनजागृती४या सायकल मोहिमेदरम्यान चांडक यांनी विविध ठिकाणी विद्यार्थी, महिला, व्यावसायिक, युवक आदी घटकांशी संवाद साधून एचआयव्ही एडस् बाधित मुलांचे शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन हे प्रश्न समजावून सांगितले. या विद्यार्थ्यांच्या पूनर्वसनासाठी प्रत्येकाने पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. या मोहिमेदरम्यान लोकेश लाटे, प्रा.जगताप, शितोळे, संजय चौधरी, रामा अभंग, सुदर्शन कांबळे, ओंकार काजळे, जयवंत गायकवाड, प्रमोद जाधव, मारोती पवार यांचे सहकार्य लाभल्याचे चांडक यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीHIV-AIDSएड्स