लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी) : तालुक्यातील कंठेश्वर-निळा परिसरातील पूर्णा नदीवर होणाऱ्या बंधाºयाच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न स्थानिक ठिकाणच्या तीनही प्रक्रिया पूर्ण करून अखेर आता मंत्रालयातील लोकशाही दिनात दाखल झाला आहे.तालुक्यातील कंठेश्वर निळा परिसरात पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाºयाच्या कामास सुरूवात होऊन दहा वर्षे झाली. अजूनही बंधाºयाचे काम अपूर्ण आहे. या कामाबाबत परिसरातील गावकऱ्यांनी आवाज उठवित हा प्रश्न तालुका, जिल्हा व विभागीय आयुक्तांच्या लोकशाही दिनात मांडला; परंतु, या कोल्हापुरी बंधाºयाचे रखडलेले काम काही केल्यास सुरु झाले नाही. त्यामुळे १३ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील लोकशाही दिनासाठी मुंबई येथे मांडण्यात आला आहे.लोकशाही दिनातून शासन नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करीत असताना लोकशाही दिनाच्या तीन टप्प्यात या बंधाºयाच्या कामास गती मिळाली नाही. प्रत्येक वेळी काम होईल, अशी आशा असताना ग्रामस्थांच्या पदरी निराशाच आली. बंधाºयाच्या रखडलेल्या बांधकामाबाबत ८ सप्टेंबर २०१७ रोजी पहिला अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रक्रियेसही दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. बंधाºयाचे काम जवळपास ७० टक्के झाले आहे. उर्वरित काम करण्यास कंत्राटदार तयार नाही. त्यामुळे संबंधित विभागाने कोल्हापुरी बंधारा उभारण्यासाठी दिलेली मुदत उलटून गेली आहे. यासाठी परत नव्याने प्रक्रिया सुरू करण्याची गरज आहे. तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी बंधाºयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या बंधाºयाच्या कामासाठी २००५-०६ मध्ये २ कोटी १० लाख ६३ हजार ९२३ रुपये या सुधारित किंमतीस मान्यता प्राप्त करण्यात आली. राज्यस्तरीय सल्लागार समितीने १५ डिसेंबर २०१५ रोजी ६६ व्या बैठकीत सुधारित प्रशासकीय अहवाल अंतिम करून महामंडळास सादर केला. त्यानंतर बंधाºयाच्या बांधकामाची सुधारित रक्कम ३ कोटी ५५ लाख ७४ हजार ८०० रुपयांपर्यंत केली गेली. या बंधाºयाच्या कामासाठी शासनाकडून वेळोवेळी सुधारित किंमत वाढवूनही हे काम रखडले आहे. बंधारा पूर्ण झाल्यास या भागातील ९०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. आता हा प्रश्न मंत्रालयाच्या लोकशाही दिनात मांडण्यात येणार असून ग्रामस्थांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या अर्जावर संजय कदम, दिगंबर सूर्यवंशी, लक्ष्मण वैद्य, पांडुरंग कदम, ओंंकार वमसतकर आदींच्या स्वाक्षºया आहेत.
परभणी : मंत्रालयातील लोकशाही दिनात बंधाऱ्याचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:22 AM