लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुंबई येथे मागील वर्षी अरुंद दादºयावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर परभणी येथील रेल्वे स्थानकावर मोठा दादरा उभारण्याचा प्रस्ताव नांदेड विभागाने पाठविला़ मात्र पाठपुरावा झाला नसल्याने दादºयाचा प्रश्न अजूनही रेंगाळलेला आहे़परभणी रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात़ औरंगाबाद, मनमाड, मुंबई, सिकंदराबाद, धर्माबाद इ. महत्त्वाच्या ठिकाणाबरोबरच जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यासाठी रेल्वेच्या सुविधेचा अधिक वापर केला जातो़ त्यामुळे प्रवाशांची संख्या अधिक आहे़ परभणी ते मिरखेलपर्यंतच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केल्यानंतर मनमाडकडे जाणाºया सर्व गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व २ वर घेतल्या जात आहेत़ तर नांदेडकडे धावणाºया गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर घेतल्या जातात़परभणी येथून औरंगाबाद, मनमाड, नाशिक, मुंबईकडे जाणाºया प्रवाशांची संख्या अधिक आहे़या सर्व प्रवाशांना आता प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून रेल्वे गाठावी लागते़ त्यामुळे दादºयाचा वापर वाढला आहे़येथील रेल्वेस्थानकावर दोन दादरे असले तरी प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दादºयाचा सर्वाधिक वापर होतो़हजारो प्रवासी याच दादºयावरून ये-जा करतात़ मात्र दादºयाची रुंदी कमी असल्याने एकच गोंधळ उडतो़ त्यामुळे नवीन ५ फूट रुंदीचा दादरा उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़ परंतु, अद्यापपर्यंत यावर हालचाली झाल्या नाहीत़ त्यामुळे हा प्रश्न रेंगाळला आहे़प्रबंधकांच्या बदलीचाही परिणामनांदेड विभागाचे तत्कालीन विभागीय प्रबंधक एक़े़ सिन्हा यांनी परभणी रेल्वे स्थानकावरील नवीन दादºयासाठीचा प्रस्ताव तयार केला असल्याचे सहा महिन्यांपूर्वी सांगितले होते़ विशेष म्हणजे हा प्रस्ताव लवकरच मंजूर होवून कामही सुरू होईल, असे सिन्हा यांनी त्यावेळी सांगितले होते़ परंतु, काही महिन्यांतच सिन्हा यांची बदली झाली़ त्रिकालज्ञा राभा हे नांदेड विभागाचे विभागीय प्रबंधक म्हणून रुजू झाले़ परंतु, अद्यापपर्यंत या दादºयासंदर्भात कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत़
परभणी : रेल्वेच्या दादऱ्याचा रेंगाळला प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:38 AM