लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी ): पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्याने ठप्प झाले होते़ मात्र तहसील प्रशासनाने कमी दराने लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून दिल्याने दिलासा मिळाला असून, तालुक्यातील रखडलेले घरकुलांची कामे पूर्ववत सुरू झाली आहेत़रमाई घरकुल योजनेंतर्गत शहरात आंबेडकरनगर, बुद्धनगर यासह विविध ठिकाणी रमाई घरकुल योजनेंंतर्गत लाभार्थ्यांची घरकुलाची बांधकामे सुरू आहेत़ बांधकाम अर्ध्यापर्यंत आल्यानंतर वाळूची आवश्यकता भासू लागली़ मात्र लिलावाची प्रक्रिया सुरू नसल्याने तालुक्यासह शहरात वाळूची टंचाई निर्माण झाली होती़ अवैधरीत्या वाळू साठा करणाºयांनी वाळूची अव्वाच्या सव्वा दराने विक्री सुरू केल्याने लाभार्थ्यांना या दराने वाळू घेणे परवडत नव्हते़त्यामुळे लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालिकेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली होती़ या मागणीचा सकारात्मक विचार करून महसूल विभागाने या लाभार्थ्यांसाठी तालुक्यातील कुंभारी शिवारातील नदीपात्रातून वाळू नेण्याची परवानगी देण्यात आली आहे़तलाठ्यांच्या उपस्थितीत रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी आपल्या वाहनातून वाळू घेऊन जात आहेत़ प्रशासनाने अल्प दरात वाळू उपलब्ध करून दिल्याने दोन महिन्यांपासून बंद पडलेल्या घरकुलांची कामे सुरू झाल्याने लाभार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ उर्वरित लाभार्थ्यांनाही वाळू उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे.७४ लाभार्थ्यांना वाळूची प्रतीक्षा२०१७-१८ या आर्थिक वर्षात ३६७ लाभार्थ्यांना घरकुलांची मंजुरी देण्यात आली होती़ परंतु, वाळूअभावी या घरकुलांची कामे रखडल्यामुळे प्रशासकीय पातळीवर हालचाली होवून ९८ लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्यात आली आहे़ परंतु, ७४ लाभार्थी अद्यापही वाळूच्या प्रतीक्षेत आहेत़लाभार्थ्यांना दिलासापंचायत समिती कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील ४९ गावांत रमाई घरकुल योजनेंतर्गत २०१७-१८ मध्ये ३६७ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले होते़ त्यापैकी ९९ घरकुले पूर्ण झाल्याची माहिती पंचायत समितीने दिली़ वाळू अभावी ग्रामीण भागातील नागरिकही त्रस्त झाले होते़४बांधकाम अपूर्ण होते़ मात्र गटविकास अधिकाºयांनी लेखी पत्र दिल्यानंतर आतापर्यंत ९८ लाभार्थ्यांना अल्पदरात म्हणजेच ८८० रुपये दराने प्रत्येक लाभार्थ्यांना २ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात आली आहे़ उर्वरित ७४ लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून दिली जाणार असल्याने लाभार्थ्यांची वाळूची चिंता आता मिटली आहे़
परभणी : घरकुल लाभार्थ्यांच्या वाळूचा प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:36 AM