शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

परभणी रेल्वे स्थानक : एक्सलेटर ‘धक्क्या’ला लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:39 AM

येथील रेल्वेस्थानकावरील एक्स्लेटर आणि लिफ्टचे काम मागील सहा महिन्यांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे दोन्ही विकासकामांचा उभारलेला ढाचा पाहूनच प्रवाशांना समाधान मानावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील रेल्वेस्थानकावरील एक्स्लेटर आणि लिफ्टचे काम मागील सहा महिन्यांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे दोन्ही विकासकामांचा उभारलेला ढाचा पाहूनच प्रवाशांना समाधान मानावे लागत आहे.परभणी रेल्वेस्थानक हे दक्षिण मध्य रेल्वे विभागातील आदर्श रेल्वेस्थानकांमध्ये समाविष्ट असलेले स्थानक आहे. मात्र या रेल्वेस्थानकावरील विकासकामांना गती मिळत नसल्याने मागील सहा महिन्यांपासून ही कामे संथगतीने सुरू आहेत. येथील प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी साधारणत: सहा महिन्यांपासून एक्स्लेटर आणि लिफ्ट उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. साधारणत: दोन महिन्यांत ही कामे पूर्ण होतील, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र सहा महिन्यांचा कालखंड उलटला तरीही कामे पूर्ण झाली नसल्याने प्रवाशांची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही. येथील रेल्वेस्थानकावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही सेलू, जालना, औरंगाबाद, मनमाड आणि मुंंबईकडे जाणारे प्रवासी अधिक आहेत. परभणी ते मिरखेल दुहेरी मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर प्लॅट फॉर्म क्रमांक ३ चा वापर सुरू करण्यात आला आहे. औरंगाबाद, जालना, मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरच घेतल्या जातात. तसेच प्लॅट फॉर्म क्र.२ वर परळी, अकोला या मार्गावर धावणाºया गाड्या उभ्या राहतात. तर प्लॅट फॉर्म क्रमांक १ चा वापर केवळ नांदेड, निझामबादकडे जाणाºया रेल्वे गाड्यांसाठीच होतो. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि २ वर प्रवाशांची संख्या अधिक आहे. या सर्व प्रवाशांना दादरा चढून हे दोन्ही प्लॅटफॉर्म गाठावे लागतात. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना त्यामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते.ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी एक्स्लेटर व लिफ्ट सुरू होणे आवश्यक आहे. मात्र ही दोन्ही कामे रेंगाळली आहेत. सहा महिन्यांपासून ही कामे सुरू असून, ती त्वरीत पूर्ण केली जात नसल्याने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांनाही दादºयाचा वापर करावा लागत आहे. अनेक वेळा तर धोकादायक पद्धतीने रेल्वे पटरी ओलांडावी लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.लिफ्ट उभारण्याचे काम रेंगाळलेएक्स्लेटरच्या जोडीलाच स्थानकावरील प्लॅट फॉर्म क्रमांक २ वर लिफ्ट उभारण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. लिफ्टसाठी बांधकामाचा ढाचा उभारण्यात आला आहे. मात्र त्यापुढील काम सध्या ठप्प पडले आहे. त्यामुळे प्लॅफफॉर्म क्रमांक २ वरील लिफ्टचा ढाचा पाहूनच प्रवाशांना समाधान मानावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी त्वरीत पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.परभणी रेल्वेस्थानकावरील एक्स्लेटरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सरकत्या जिन्याच्या सर्व पायºया बसविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यावर शेड टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र एक्स्लेटर अद्याप सुरू झाले नाहीत.४सुरुवातीला एक्स्लेटर नेमके बसवायचे कोठे? यावरुन वाद झाला. यासाठी आलेले साहित्यही अन्यत्र हलविण्यात आले. अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र सहा महिन्यांपासून हे कामही पूर्ण झाले नाही. तेव्हा रेल्वे प्रशासनाने तातडीने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वे