शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

परभणी रेल्वेस्थानक:सरकता जीना उरला नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:04 AM

येथील रेल्वे स्थानकावर चुकीच्या ठिकाणी सरकता जीना उभारल्याने या जीन्याचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या बोटावर मोजण्या इतकीही नाही. परिणामी हा जीना नावालाच उरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: येथील रेल्वे स्थानकावर चुकीच्या ठिकाणी सरकता जीना उभारल्याने या जीन्याचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या बोटावर मोजण्या इतकीही नाही. परिणामी हा जीना नावालाच उरला आहे.परभणीरेल्वे स्थानकावर तीन प्लॅटफॉर्म असून प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ वर जाण्यासाठी आणि त्या प्लॅट फॉर्मवरुन प्लॅट फॉर्म क्रमांक १ वर येण्यासाठी प्रवाशांची होणारी गैरसोय टळावी, या उद्देशाने रेल्वे स्थानकावर पश्चिम बाजुला सरकत्या जिन्याची उभारणी करण्यात आली आहे. परभणी रेल्वेस्थानक हे आदर्श रेल्वेस्थानकात मोडणारे असून या ठिकाणी प्रवाशांची संख्याही अधिक आहे. स्थानकावर सर्वाधिक वापर होणारा दादरा अरुंद असून या दादºयाला पर्याय म्हणून काही वर्षांपूर्वी मोठा दादराही बांधण्यात आला; परंतु हा दादरा स्थानकाच्या एका कडेला आहे. याच दादºयावर सरकता जीना आणि प्लॅटफॉर्म दोनवर लिफ्ट बसविण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले. वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर कामाला सुरुवात झाली. दोन महिन्यांपूर्वी सरकत्या जिन्याचे काम पूर्ण झाले असून तो कार्यान्वितही झाला आहे. मात्र रेल्वे स्थानकाच्या एका कडेला हा सरकता जीना असल्याने प्रवासी या जीन्याचा वापर करीत नसल्याचे दिसत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ वर थांबणाºया रेल्वेगाड्यांचे डबे या जीन्यापर्यंत देखील पोहचत नाहीत. त्यामुळे अधिकतर प्रवासी जुन्याच दादºयावरुन रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराकडे येत असल्याचे दिसून आले. स्थानकावर उभारण्यात आलेला सरकता जीना प्लॅट फॉर्म क्रमांक २ व ३ वर रेल्वेगाडी दाखल झाल्यानंतर सुरु केला जातो. या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने हा जीना उभारण्यात आला; परंतु, या जीन्याचा प्रवासी वापरच करीत नसल्याचे दिसत आहे. दिवसभरातून जास्तीत जास्त ५० ते ६० प्रवासी या जीन्याचा वापर करीत असावेत, असा अंदाज आहे.स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दूर अंतरावर हा सरकता जीना उभारल्याने प्रवाशांनी या जीन्याकडेही पाठ फिरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून सरकता जीना कार्यान्वित होऊनही त्याचा वापर होत नसल्याने हा जीना नावालाच शिल्लक राहिल्याचे दिसत आहे.लिफ्ट उभारणीचे काम अर्धवट४परभणी रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सरकता जीना आणि प्लॅट फॉर्म क्रमांक दोनवर लिफ्ट उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी सरकत्या जीन्याचे काम पूर्ण झाले असून हा जीना कार्यान्वितही झाला आहे. मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील लिफ्टचे काम शिल्लक आहे. लिफ्ट उभारणीसाठी ढाच्या तयार करण्यात आला असून पुढील काम मात्र ठप्प आहे.४तात्पुरत्या स्वरुपात सरकता जीना कार्यान्वित करण्यात आला आहे. दादºयावर चढणे आणि उतरणे या दोन्ही कामासाठी हा जीना वापरात येतो. त्यामुळे प्लॅट फॉर्म क्रमांक दोनवरुन दादरा चढून आलेल्या प्रवाशांना सरकत्या जीन्यावरुन खाली उतरण्याची सुविधा उपलब्ध आहे. लिफ्टचे काम पूर्ण झाल्यानंतरच खºया अर्थाने या दादºयाचा वापर वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा रेल्वे प्रशासनाने लिफ्टचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.४सध्या तरी प्रवासी पूर्वीप्रमाणेच जुन्या दादºयाचा वापर करीत आहेत. तर अनेक प्रवासी धोकादायक पद्धतीने रेल्वे पटरी ओलांडून प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ वर जात आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वे