लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील रेल्वेस्थानकावर सहा मीटर रुंदीचा नवीन पादचारी पूल बांधण्याचे काम सुरु झाले असून येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.दक्षिण मध्य रेल्वे विभागातील नांदेड उपविभागातील परभणी हे महत्त्वाचे रेल्वेस्थानक असून रेल्वे प्रशासनाच्या आदर्श रेल्वे स्थानकांच्या यादीत परभणीचा समावेश आहे. दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरुन रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे परभणी जिल्ह्यातून रेल्वे प्रशासनाला चांगले उत्पन्नही मिळते. मात्र त्या तुलनेत येथील रेल्वे स्थानकावर सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांमधून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात होती. मागील काही महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाने परभणी रेल्वे स्थानकावर सुविधा उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत स्लायडिंग स्टेप्स्, लिफ्ट या प्रमुख सुविधांबरोबरच प्रवाशांसाठी वायफायची सुविधा या स्थानकावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.रेल्वे स्थानकावर मुख्य प्रवेशद्वार आणि बसस्थानकाकडील बाजूने असे दोन पादचारी पूल (दादरे) उपलब्ध आहेत. मुख्य प्रवेशद्वाराजवळील पादचारी पुलाचा सर्वाधिक वापर केला जातो. मात्र हा पूल जुना झाला असून अरुंदही आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी हा पादचारी पूल धोकादायक बनला आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता सध्याचा पादचारी पूल गैरसोयीचा ठरत असल्याने रेल्वेच्या नांदेड विभागाने परभणी स्थानकावर नवीन रुंद पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठविला होता. साधारणत: वर्षभरापासून हा प्रस्ताव रखडला होता.वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आणि प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने परभणी रेल्वेस्थानकावर नवीन पादचारी पूल उभारण्यास मंजुरी दिली असून ८ मार्चपासून या पुलाच्या उभारणीचे कामही सुरु झाले आहे. रेल्वेस्थानकावरील जुन्या दादऱ्यापासून १५ ते २० फूट अंतरावर हा नवीन पादचारी पूल उभारला जात आहे. या पुलासाठी नुकतेच खोदकामही सुरु झाले असून एप्रिल २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. दादरा उभारण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने येथील प्रवाशांची गैरसोय लवकरच दूर होणार आहे.साडेपाच कोटी रुपये : पूल उभारण्यासाठी लागणार खर्च४परभणी रेल्वेस्थानकावर नव्याने उभारण्यात येणाºया दादºयासाठी साधारणत: ५ कोटी ५३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या स्थानकावर सध्या २ मीटर रुंदीचा दादर असून नवीन दादºयाची रुंदी ६ मीटर एवढी आहे. विशेष म्हणजे या दादºयाच्या पायऱ्यांची रुंदीही ४ मीटरपर्यंत असेल. परभणी रेल्वेस्थानकावर प्रवाशांची संख्या वाढत असून जुना दादरा अपुरा पडत असल्याने हा नवीन दादरा उभारला जात आहे. ६ मीटर रुंदी असलेल्या या दादºयामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.प्लॅटफॉर्म तीनचा वाढला वापरमिरखेल ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर परभणी रेल्वेस्थानकावर मनमाडकडे जाणाºया रेल्वेगाड्यांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ चा वापर सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे दादरा ओलांडून प्लॅटफॉर्म क्रमांक ३ कडे जाणाºया प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र सध्याचा दादरा अरुंद व जुना असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
परभणी रेल्वेस्थानकावर पादचारी पुलाचे काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:50 PM