लोकमत न्यूज नेटवर्कगौर (परभणी): पूर्णा तालुक्यातील गौर व परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एक तास वादळी वाºयासह पाऊस झाला. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाºयामुळे विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. तर अनेक ठिकाणी झाडे आडवी झाली आहेत.शुक्रवारी गौर व परिसरात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस ही पिके बहरात आली असतानाच एक तास वादळी वाºयासह पाऊस झाला. या वाºयामध्ये कापूस पीक आडवे झाले आहे. त्याच बरोबर अनेक ठिकाणी वीज खांब पडले आहेत. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.पाथरी, गंगाखेड, सेलूमध्ये पाऊस४शुक्रवारी पाथरी शहरात दुपारी अर्धातास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. शहरातील नाले व रस्त्यावरुन पाणी वाहिले. गंगाखेड येथे दिवसभर ढगाळ वातावरण होते.४सायंकाळच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. त्याच बरोबर सेलू व परिसरात दुपारी २ वाजेच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मानवतमध्ये दिवसभर ढगाळ वातवरण होते.
परभणी : गौर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 1:03 AM