लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रविवारी सायंकाळनंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला़ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली़जिल्ह्यात रविवारी दिवसभर कडक ऊन पडले होते़ सायंकाळच्या सुमारास मात्र वातावरणात बदल झाला़ परभणी शहर आणि परिसरात सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होवून सोसाट्याचे वारे वाहू लागले़ रात्री ७़३० वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाच्या एक-दोन सरी कोसळल्या़ रात्री उशिरापर्यंत विजांचा कडकडाट सुरू होता़ गंगाखेड शहरात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास १५ मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ शहर परिसरात हा पाऊस होता़ पाथरी शहर आणि परिसरातही विजांच्या कडकडाटासह १० मिनिटे जोरदार पावसाने हजेरी लावली़ त्यानंतर हलका पाऊस सुरू होता़ वादळी वाºयासह पाऊस झाल्याने धांदल उडाली आहे़ सेलू, पालम येथेही पावसाने हजेरी लावली आहे़ पूर्णा परिसरात सायंकाळच्या सुमारास १० ते १५ मिनिटे पावसाच्या सरी झाल्या़ विजांच्या कडकडाटासह अचानक झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता़सध्या शेत शिवारांमध्ये रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ही पिके उभी आहेत़ पिकांची वाढही समाधानकारक आहे़ रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाºयामुळे गहू आणि ज्वारी या पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे़पावसाच्या सरी४खंडाळी : खंडळीसह परिसरात १ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली.४ताडबोरगाव : सायंकाळी ७ च्या सुमारास २० ते २५ मिनिटे पाऊस झाला़ सध्या या भागात पीक काढणीचे काम सुरू आहे. पावसामुळे काढणीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला.
परभणी : विजांच्या कडकडाटासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 10:29 PM