लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पाऊस होत असून, मंगळवारी रात्री पालम आणि पाथरी तालुक्यातील हादगाव मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे़ या दोन्ही मंडळात झालेल्या धुवाँधार पावसामुळे ओढे-नाल्यांना पूर आला होता़यावर्षीच्या पावसाळ्यात शेवटच्या चरणात जोरदार पाऊस होत आहे़ आठवडाभरापासून जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी लागत आहे़ मंगळवारी परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली़ त्यात पालम तालुक्यातील पालम मंडळात ६६ मिमी तर पाथरी तालुक्यातील हादगाव मंडळामध्ये ८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ विशेष म्हणजे रविवारी देखील हादगाव मंडळात जोरदार पाऊस झाल्याने हादगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा आणि काही घरे पाण्याखाली आली होती़ या मंडळात सलग दुसऱ्यांदा मोठा पाऊस झाला आहे़जिल्हाभरात दमदार पाऊस झाला असून, महसूल प्रशासनाने घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासांत परभणी तालुक्यात १५ मिमी, पालम ५०़६७ मिमी, पूर्णा १२़२०, गंगाखेड ९, सोनपेठ २, सेलू ११़४०, पथरी ३०, मानवत तालुक्यात ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्यात सरासरी १५़२५ मिमी पाऊस झाला असून, जिल्हाभरात आतापर्यंत ५६२़२८ टक्के पाऊस झाला़ सरासरीच्या तुलनेत ७२ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात सर्वाधिक ८६ टक्के म्हणजे ६६१ मिमी पाऊस झाला आहे़ त्याखालोखाल पालम तालुक्यामध्ये ८४ टक्के म्हणजेच ५९२ मिमी पाऊस झाला तर परभणी ताुलक्यात ४५७ मिमी (५६़९ टक्के), पूर्णा तालुक्यात ६९१ मिमी (८१ टक्के), गंगाखेड ५८२ मिमी (८३ टक्के), सोनपेठ ५१६ मिमी (७४ टक्के), सेलू ५०३ मिमी (६१ टक्के), जिंतूर ४८८ मिमी (६० टक्के) आणि मानवत तालुक्यात ६०८ मिमी (७४़५ टक्के) पाऊस झाला आहे़आॅक्टोबरच्या दुसºया आठवड्यात परतीचा पाऊस४अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि तेलंगणा भागात सध्या पाऊस होत आहे़४हा पाऊस मान्सूनचा असून, अद्याप परतीच्या पावसाला सुरुवात झाली नाही, अशी माहिती कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांनी दिली़४मान्सूनचा कालावधी हा सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर असा चार महिन्यांचा असतो़ सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे़४मात्र यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला दोन महिने मान्सून उशिराने दाखल झाला़ त्यामुळे परतीचा पाऊसही आॅक्टोबरच्या दुसºया आठवड्यापासून सुरू होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे़परभणीत पाऊसबुधवारी परभणी शहर आणि परिसरात दुपारी ३ वाजेच्या सुमारास मध्यम पाऊस झाला़ १० ते १५ मिनिटांच्या या पावसाने शहरवासियांची तारांबळ उडाली़ दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी समाधानकारक पाऊस मात्र झाला नाही़सलग दोन दिवस अतिवृष्टी४पाथरी तालुक्यातील हादगाव मंडळात २० ते २५ सप्टेंबर या सहा दिवसांमध्ये २३१ मिमी पाऊस झाला आहे़ विशेष म्हणजे सलग दोन दिवस या मंडळात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे़ तालुक्यात पावसाळ्याच्या शेवटी दमदार पाऊस होत असून, या पावसामुळे ओढे, नाल्यांना पूर आला आहे़ तालुक्यातील इतर मंडळांच्या तुलनेत हादगाव मंडळात मात्र जोरदार पाऊस झाला आहे़सोयाबीन, कापसाच्या पिकांना तडाखा४हादगाव आणि परिसरात अतिवृष्टी झाल्याने या भागातील सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला फटका बसला आहे़ सोयाबीन काढणीच्या अवस्थेत असून, सहा दिवसांपासून होत असलेल्या पावसाने शेतात पाणी साचले आहे़ यावर्षी सोयाबीनचे पीक बहरात आहे; परंतु, जास्तीच्या पावसामुळे पीक पिवळे पडू लागले असून, उतारा कमी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़ तेव्हा पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे़ढालेगाव, मुदगल बंधारा पाण्याने तुडुंब४जायकवाडी प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल बंधाºयात साठविण्यात आले आहे़ त्यामुळे हे दोन्ही बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत़ आठ दिवसांपासून या बंधाºयातील एका गेटमधून ७ हजार क्युसेसपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ गरज पडल्यास दुसºया गेटमधूनही पाणी सोडले जात आहे़ दोन्ही बंधारे पाण्याने भरल्यामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़
परभणी : दोन मंडळांत अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:46 PM