लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४़३० वाजता जिल्हा न्यायालय परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली़प्रमुख जिल्हा व सत्र न्या़ एच़एस़ महाजन, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव शेख अकबर शेख जाफर, वकील संघाचे अध्यक्ष राजेश चव्हाण, जिल्हा सरकारी वकील डी़यू़ दराडे यांच्या उपस्थितीत रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला़ जिल्हा न्यायालय येथून निघालेली ही रॅली स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते वसमत रोडवरील राजगोपालाचारी उद्यानापर्यंत काढण्यात आली़ या ठिकाणी जनजागृती शिबीर घेण्यात आले़ अॅड़ जीवन पेडगावकर यांनी प्रास्ताविक केले़ अॅड़ अमोल गिराम यांनी मार्गदर्शन केले़ संविधान ही आपली रक्त वाहिनी असून, त्याचे पालन करणे, गरजेचे आहे़, असे मत न्या़शेख अकबर शेख जाफर यांनी व्यक्त केले़ कार्यक्रमास वकील संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक जिल्हा न्यायालयातील प्रबंधक पी़व्ही़ काळे आदींची उपस्थिती होती.महापालिकेत संविधान दिनपरभणी- महानगरपालिकेच्या सभागृहात मंगळवारी संविधान दिन साजरा करण्यात आला़ या प्रसंगी नूतन महापौर अनिता रवींद्र सोनकांबळे, माजी नगरसेवक रवि सोनकांबळे, उपायुक्त गणपत जाधव, अंतर्गत लेखापाल यु़डी़ राठोड, आस्थापना विभागप्रमुख आनंद मोरे, नगर सचिव विकास रत्नपारखी, उमेश जाधव, राजकुमार जाधव, भारत सोळंके, सुलभा देशपांडे आदींची उपस्थिती होती़ महापौर अनिता सोनकांबळे यांनी उपस्थितांना शपथ दिली़
परभणी : रॅलीच्या माध्यमातून केली जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:18 AM