लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांची अर्धवट पीक कर्ज माफी केली. त्यातच भरीस भर म्हणून पीककर्ज माफीच्या रक्कमेवरील व्याजाची वसुली शेतकऱ्यांकडून बँका करीत असल्याने दुष्काळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले असल्याची परिस्थिती तालुक्यात दिसून येत आहे.शहरातील स्टेट बॅक आॅफ इंडिया या शाखेने शेतकºयांनी घेतलेल्या ुपीक कर्जावरील व्याजाच्या वसुलीचा सपाटा लावला आहे. शासनस्तरावरून पीककर्ज वसुलीस स्थगिती दिली असतानाही बँक प्रशासन मनमानी कारभार करीत आहे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करुन कर्जमाफीसाठी शेतकºयांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले होते. त्यामध्ये पात्र शेतकºयांना कर्जमाफीचे संदेश बँक तसेच शासनस्तरावरुन पाठविण्यात आले होते. मात्र ही योजना कुचकामी ठरली असल्याने अनेक शेतकरी कर्ज माफीपासून वंचीत राहीले आहेत. मात्र अनेक शेतकºयांची नावे कर्जमाफीच्या यादीमध्ये असतांना देखील बँकेच्या वतीने पीक कर्जमाफीसाठी रक्कमेवर व्याज आकारणी केली जात आहे. सध्या तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात सापडला आहे. सद्य स्थितीत व्याजाची रक्कम भरणा करण्या इतपत पैसा शेतकºयांकडे नसल्याने ते भरणा करुन शकत नाहीत. त्यामध्ये बँकांनी वसुली करण्याचे आडमुठे धोरण अवंलबिले असल्याने शेतकºयांना पीक कर्जापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ही व्याज आकारणी तत्काळ थांबविण्याची मागणी लाभार्थी शेतकºयातून होत आहे.शेतकºयांची तहसील प्रशासनाकडे धावसध्या तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रबी व खरीप हंगामात शेतकºयांना उत्पन्न मिळाले नाही. परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असतानाच बँकांकडून शेतकºयांच्या कर्जमाफीच्या रकमेवरील व्याज वसुल करणे सुरू आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार तत्काळ बंद करावा, अशी मागणी सेलू तालुक्यातील गोगलगाव येथील शेतकरी सुरेश मगर यांनी तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
परभणी: बँकांकडून होतेय व्याजाची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:20 PM