लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दीन दयाल अंत्योदय- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत परभणी मनपाच्या वतीने १८ जानेवारी रोजी शहरातील बी.रघुनाथ सभागृहात शहरी समृद्धी उत्सव अंतर्गत रोजगार मेळाव्यात ५ हजार सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी करण्यात आली. त्यातील ७५० युवकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महापौर मीनाताई वरपूडकर ह्या होत्या. या मेळाव्याचे उद्घाटन आयुक्त रमेश पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमहापौर माजू लाला, भगवानराव वाघमारे, सचिन देशमुख, नागेश सोनपसारे, रितेश जैन, डॉ.विद्या गायकवाड आदींची उपस्थिती होती. या मेळाव्यात ५ हजार सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी केली असून यामधून ७५० युवकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात १३ देशी व विदेशी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी एस.एस.मस्के, एम.आय.शेख, नागसेन कांबळे, वंदना परतवाघ, अर्जून झटे, बाळासाहेब चंदेल, कुशावर्ता जंगले, नंदाबाई बोरकर आदींनी प्रयत्न केले.
परभणी : ५ हजार सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:38 PM