लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला लागून असलेली बलसा खु. गावाच्या शिवारात गावठाण जमीन आणि पाटबंधारे विभागाच्या जमिनीवर झालेले घरांचे अतिक्रमण प्रशासनाने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात काढले.येथील बलसा खु. शिवारामध्ये ३७ ते ३८ जणांनी पत्र्याचे टीनशेड टाकून अतिक्रमण केले होते. या प्रकरणी अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन ही अतिक्रमणे काढून घेण्याचे सूचविले होते. याविरुद्ध अतिक्रमणधारकांनी न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. मात्र न्यायालयाने अतिक्रमणधारकांच्या विरोधात निर्णय दिला. त्यामुळे शुक्रवारी तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु केली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास अधिकारी पोलीस बंदोबस्तासह अतिक्रमणस्थळी पोहचले. यावेळी तहसीलदार विद्याचरण कडावकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांची उपस्थिती होती. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेसी, पोलीस निरीक्षक नरसिंह ठाकूर हे पोलीस कर्मचाºयांसह या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान, सुरुवातीला कारवाईला विरोध केला. मात्र काही वेळानंतर अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतल्याची माहिती गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी दिली.
परभणी : बलसा परिसरातील काढली अतिक्रमणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 12:24 AM