लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): धनगर समाजाची आरक्षण प्रक्रिया ही केंद्र शासनाच्या अख्त्यारित असून या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी सोडवून समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही पशूसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी येथे दिली.पूर्णा येथे राष्ट्रीय समाज पक्ष व रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या वतीने ८ डिसेंबर रोजी महादेव जानकर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पार पडलेल्या कार्यक्रमास गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे, रासपचे राष्ट्रीय सचिव बाळासाहेब दौंडतले, नंदकुमार पटेल, सुरेश बडगर, किशनराव भोसले, राजेश फड, सीताराम राठोड, अखिल अन्सारी, विलास गाढवे, संदीप आळनुरे, कृष्णा सोळंके, शाम गायकवाड, नागेश एंगडे आदींची उपस्थिती होती.यावेळी रत्नाकर गुट्टे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पूर्णा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परभणी : अडचणी सोडवून धनगर आरक्षण प्रश्न निकाली काढू- महादेव जानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:33 AM