लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शैक्षणिक कामकाजात अडथळा आणून कामकाज बंद पाडले तर मुख्याध्यापकांनी संबंधितांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवावेत, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी काढले आहेत़स्थानिक समस्या सोडविण्याच्या कारणास्तव शाळा बंद पाडणे, शाळांना कुलूप ठोकणे असे प्रकार जिल्ह्यात होत आहेत़ त्यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळा निर्माण होत आहे़ अनेक वेळा या प्रकारानंतर शिक्षण विभागाकडून कुठलीही कारवाई केली जात नव्हती़ दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्याध्यापकांना पत्र पाठविले असून, त्यात शैक्षणिक कामकाजासंदर्भात सूचना केल्या आहेत़ विविध कारणास्तव शाळेच्या दैनंदिन कामकाजात अडथळा आणणे, शाळा सुरू असताना बंद करणे, शाळेला कुलूप लावणे अशा अडचणी निर्माण केल्या जात आहेत़ त्यामुळे काम करणे अशक्य होते़ अशा प्रकरणांमध्ये कार्यालयीन कामात अडथळा आणणाऱ्यांविरूद्ध जवळच्या पोलीस ठाण्यात कायदेशीर कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत़ त्याचप्रमाणे अशा प्रकारची कार्यवाही न केल्यास आपणाविरूद्ध प्रशासकीय कार्यवाही केली जाईल, असा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिला आहे़
परभणी : शैक्षणिक कामकाजात अडथळे आणल्यास गुन्हे नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:36 AM