शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

परभणी : ई टेंडरिंगसाठी रिपब्लिकन सेनेचे घेराव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:00 AM

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात नियमबाह्य गुत्तेदारी पद्धत बंद करून ई-टेंडररिंंग पद्धत सुरू करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली १० जून रोजी कुलसचिवांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात नियमबाह्य गुत्तेदारी पद्धत बंद करून ई-टेंडररिंंग पद्धत सुरू करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली १० जून रोजी कुलसचिवांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़विद्यापीठात सुरू असलेली गुत्तेदारी पद्धत बंद करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता़ मात्र त्या संदर्भात निर्णय झाला नाही़ त्यामुळे सोमवारी विजय वाकोडे यांच्यासह कार्यकर्ते विद्यापीठ परिसरात पोहचले़ विद्यापीठाचे मुख्य गेट बंद करून कुलसचिवांना घेराव घालण्यात आला़ विद्यापीठातील गुत्तेदारांची चिठ्ठी पद्धत बंद करून ई टेंडरिंग पद्धत लागू करावी, १ एप्रिल २००१ रोजी कामावरून कमी केलेल्या मागासवर्गीय मजुरांना गुत्तेदारी पद्धतीमध्ये रोजंदारीचे काम उपलब्ध करून द्यावे, मागासवर्गीय प्रकल्पग्रस्तांच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या रिक्त जागा भराव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़ कुलसचिव पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली़ ई टेंडरिंग प्रमाणेच कामे देण्यात येतील, असे आश्वासन कुलसचिवांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ या आंदोलनात एस़टी़ गायकवाड, नितीन गायकवाड, मनोज उबाळे, मनोज कांबळे, प्रभाकर जाधव, संदीप उबाळे, कृष्णा पाचपुंजे, राजू जाधव, प्रशांत तळेगावकर, उमेश भदर्गे, कमलबाई गायकवाड, देवईबाई गायकवाड, संगीता गरुड, धृपदाबाई उबाळे, गंगुबाई जाधव आदींनी सहभाग नोंदविला़ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ५२ गुत्तेदार कार्यरत आहेत़ गुत्तेदारांच्या यादीत एकाच कुटूंबातील एकापेक्षा अधिक जणांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत़ त्यामुळे मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त कामगारांवर अन्याय होत आहे़ विद्यापीठ प्रशासन नियमबाह्यपणे खाजगी गुत्तेदारांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप यावेळी विजय वाकोडे यांनी केला़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन