लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वच्छता अभियानांतर्गत महापालिकेने सुरू केलेल्या स्वच्छता अॅपवर नागरिकांनी केलेल्या तक्रारींचा ४ तासांत निपटारा केला जाईल, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली़स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता आयुक्त रमेश पवार यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली़ यावेळी उपायुक्त जायभाये, आरोग्य अधिकारी डॉ़आरती देऊळकर, डॉक़ल्पना सावंत यांच्यासह विभागप्रमुख, सहाय्यक आयुक्त उपस्थित होते़ यावेळी आयुक्त रमेश पवार यांनी स्वच्छता अॅप कशा प्रकारे डाऊनलोड करायचे, याची माहिती दिली़नागरिकांनी या अॅपवर तक्रार दाखल केल्यानंतर त्याचा ४ तासांमध्ये निपटारा करण्यात येईल़ मनपा कर्मचाऱ्यांनी अॅपची जनजागृती करून हे अॅप वापरण्याचे आवाहन नागरिकांना करावे, असेही पवार यांनी सांगितले़ यावेळी आशा वर्कर्स, अंगणवाडी वर्कर्स, मलेरिया विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य, शहर अभियंता, पाणीपुरवठा आदी विभागातील कर्मचारी उपस्थित होते़कसे डाऊनलोड करावे अॅप४स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यासाठी अँड्राईड मोबाईलच्या प्लेस्टोअरवर जाऊन स्वच्छता एमओएचयुएवर क्लिक करून इन्स्टॉल बटन दाबावे, त्यानंतर भाषा निवडून आपला मोबाईल क्रमांक टाकावा, या प्रक्रियेनंतर मोबाईलवर आलेला ओटीपी व्हेअरीफाईड केल्यानंतर लोकेशन सलेक्ट करून तक्रार नोंदवावी, असे यावेळी सांगण्यात आले़
परभणी : अॅपवर दाखल झालेल्या तक्रारींचा चार तासांत निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:36 AM