लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील नांदखेडा रोडवरील महाकालेश्वरी मंदिरात जगतगुरु पलसिद्ध सेवाश्रमात सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या उपस्थितीत आयोजित तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़या कार्यक्रमात शि़भ़प़ सोनबा गुरुजी शिराळे, नागेश स्वामी, मन्मथअप्पा खके, बबन आप्पा कौसडीकर, चंद्रशेखर स्वामी कौसडीकर, सरस्वती कार्तिक स्वामी आदींनी दररोज पलसिद्ध चरित्र पारायणाचे नेतृत्व केले़ अनिल स्वामी जिंतूरकर यांचे प्रवचन झाले़ वेदांताचार्य श्री गुरु डिगांबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत यांचे काल्याचे कीर्तन झाले़ या कार्यक्रमात ग्रंथपारायण, चरित्र पारायण, प्रवचन, कीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले़ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या अध्यक्षतेखाली समारोप झाला़ या प्रसंगी महापौर मीनाताई वरपूडकर, संप्रिया राहुल पाटील, डॉ़ विवेक नावंदर, सुशील देशमुख, शिवसांभ सोनटक्के, गंगाप्रसाद आणेराव, डॉ़ मदन लांडगे, सुमनताई खेडकर, शांताय्या स्वामी दैठणकर, अनिल फुलवाडकर, शिवहर आप्पा चोकनफळे, नीलकंठ राऊत, ज्ञानेश्वर सरकाळे, मन्मथ देशमाने आदींची प्रमुख उपस्थिती होती़संभाजी शेवटे यांनी सूत्रसंचालन केले़ बंडू पाचलिंग यांनी आभार मानले़८० भाविकांना दिली शिवदीक्षा४तीन दिवसांच्या या धार्मिक कार्यक्रमामध्ये एकूण ८० भाविकांना शिवदीक्षा देण्यात आली़ कार्यक्रमामध्ये रामेश्वर कुबडे, महेश स्वामी, बंडू अप्पा फुलारी, वीरभद्र स्वामी, नागनाथ डोंगरे, शांतय्या स्वामी, धोंडीराम फुलारी, शिवहार चोखनफळे, नीळकंठअप्पा राऊत, ज्ञानेश्वर सरकाळे, मन्मथ देशमाने, अनिल फुलवाडकर आदींचा सत्कार करण्यात आला़
परभणी :वीरशैव समाजाच्या धार्मिक कार्यक्रमास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:03 AM