लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात ३१ आॅगस्ट ते २ सप्टेंबर असे सलग तीन दिवस पाऊस झाल्यानंतर मंगळवारी चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली़जिल्ह्यात तब्बल २२ दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती़ त्यामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते़ ३१ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली़ या दिवशी जिल्ह्यात सरासरी २१़६३ मिमी पावसाची नोंद झाली़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा जिल्ह्यात सरासरी ४०़७० मिमी पाऊस झाला़ त्यामध्ये तब्बल ६१ मिमी पाऊस सोनपेठ तालुक्यात तर ५७़५० मिमी पाऊस गंगाखेड तालुक्यात झाला़ त्यानंतर २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सरासरी ३७़१७ मिमी पावसाची नोंद झाली़ या दिवशी तब्बल ६३ मिमी पाऊस जिंतूर तालुक्यात झाला़ तर ५६़३३ मिमी पाऊस पालम तालुक्यात झाला़ तीन दिवसांत तब्बल ९९़५१ मिमी पाऊस झाला़ ३ सप्टेंबर रोजी मात्र पावसाने उघडीप दिली़ सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांतील ओढे व नाले पहिल्यांदाच वाहिले़ या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे़
परभणी : चौथ्या दिवशी पावसाची विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 11:30 PM