शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

परभणी :उपविभागीय अधिकारीस्तरावर वाळू लिलावाचे अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:16 AM

महसूल विभागाने जप्त केलेल्या वाळूसाठ्यांचा लिलाव करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाºयांना तीन महिन्यांपूर्वीच देण्यात आले असून जनतेला संबंधित कार्यालयस्तरावर १८०० रुपये ब्रास या शासकीय दराने वाळू खरेदी करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महसूल विभागाने जप्त केलेल्या वाळूसाठ्यांचा लिलाव करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाºयांना तीन महिन्यांपूर्वीच देण्यात आले असून जनतेला संबंधित कार्यालयस्तरावर १८०० रुपये ब्रास या शासकीय दराने वाळू खरेदी करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिली.जिल्ह्यात महसूल विभागाने अवैधरित्या जप्त केलेल्या ५९ हजार ५९७ ब्रास वाळूचा साठा शिल्लक असतानाही बाजारामध्ये वाळूचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी ५ हजार रुपये ब्रासने वाळूची विक्री केली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ६ जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. या अनुषंगाने माहिती देताना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर म्हणाले की, तीन महिन्यांपूर्वीच उपविभागीय अधिकारीस्तरावर महसूल विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठ्यांचे लिलाव करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तरीही याबाबत का लिलाव झालेला नाही, याची माहिती घेतली जाईल. जनतेलाही उपविभागीय अधिकारीस्तरावरच १८०० रुपये प्रति ब्रास शासकीय दराने वाळू खरेदी करता येईल. यासाठी संबंधितांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही ‘लोकमत’शी बोलताना जिल्हाधिकाºयांनी केले.