शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 11:38 PM

निम्न दुधना प्रकल्पातून काढलेल्या उजव्या कालव्याची जागोजागी दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, या कालव्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी फरश्या उखडल्या असून कालव्याची दुरवस्था झाल्याने या वितरिकेतून पाणी मिळेल की नाही, अशी भिती लाभार्थी शेतकरी व्यक्त करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: निम्न दुधना प्रकल्पातून काढलेल्या उजव्या कालव्याची जागोजागी दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, या कालव्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी फरश्या उखडल्या असून कालव्याची दुरवस्था झाल्याने या वितरिकेतून पाणी मिळेल की नाही, अशी भिती लाभार्थी शेतकरी व्यक्त करीत आहेत.प्रधानमंत्री सिंचाई योजनेंतर्गत सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना प्रकल्पाचा समावेश करण्यात आला. या प्रकल्पाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली होती. २०१८-१९ मध्ये या कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. तर २०१७-१८ मधील २७ कोटी २८ लाख असा एकूण ५२ कोटी २८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून मार्च २०१९ अखेर ६१२ हेक्टरपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यावर १७ कोटी ३९ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.दरम्यान, निम्न दुधना प्रकल्पापासून उजवा आणि डावा असे दोन कालवे काढले असून या कालव्यांच्या माध्यमातून प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने दोन्ही कालव्यांची कामे हाती घेण्यात आली. प्रशासनाच्या माहितीनुसार या कालव्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून जुलै अखेर हे काम पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, परभणी तालुक्यातील काही गावांमधून उजव्या कालव्याचे काम करण्यात आले आहे. त्यापैकी कुंभारी बाजार, कारला, नांदापूर, डिग्रस, मांडवा, काष्टगाव, पिंपळगाव स.मि., वाडी, गोविंदपूर, एकरुखा आदी गावांमध्ये या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. काही भागात हे काम अर्धवट अवस्थेत आहे. या कालव्यातून अद्याप पाणीही वाहिले नसताना अनेक भागामध्ये कालव्याची दुरवस्था झाली आहे. कालव्यात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. काही ठिकाणी या कालव्याची फरशी उखडून गेली आहे. तर काही भागात कालव्याचा काही हिस्साच ढासळला आहे. त्यामुळे या कालव्यातून पाणी सोडल्यास ते शेवटच्या टोकापर्यंत पोहचेल की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. कालव्याची कामे करताना मुरुम, सिमेंट, वाळूचा वापर पुरेश्या प्रमाणात झाला नाही, असा ग्रामस्थांना आरोप आहे.१६ हजार हेक्टर सिंचन क्षमता४निम्न दुधना प्रकल्पापासून निघालेल्या उजव्या कालव्याची लांबी ४८ कि.मी. एवढी असून या कालव्याच्या माध्यमातून १६ हजार २९६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे सिंचन होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र कालव्याचे एकंदर काम पाहता सिंचनामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. सद्यस्थितीला कुंभारी बाजारसह डिग्रस, मांडवा या भागात कालव्याचे काम सुरु आहे. कार्ला परिसरात या कालव्याची जागोजागी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कालव्याच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.गुणवत्तेकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष४प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम अनेक ठिकाणी उखडले असतानाही त्याची डागडुजी करण्यात आली नाही. किंवा कामाच्या गुणवत्तेबाबतही अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे काम वेळीच दर्जेदार केले असते तर कुंभारीसह इतर गावातील लाभार्थी शेतकºयांच्या सिंचनाचा प्रश्न मिटला असता; परंतु, सद्यस्थितीला कालव्याची परिस्थिती पाहता या कालव्यातून टेलपर्यंत पाणी पोहचणे शक्य नसल्याने ग्रामस्थांच्या चिंता वाढल्या आहेत.परभणी तालुक्यातील ज्या भागातून उजवा कालवा गेला आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काळ्या मातीची जमीन आहे. त्यामुळे कालव्याला तडे जाणे किंवा फरशी उखडण्याचे प्रकार झाले आहेत. निविदेतील तरतुदीप्रमाणे काम करण्यात आले; परंतु, काळ्या मातीची खोली लक्षात घेता, सिमेंट कॉंक्रिटचा थर वाढविण्याची आवश्यकता असल्याने ज्या भागात कालवा खराब झाला आहे, तेथे अधिक जाडीचा थर देऊन काम करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. खराब झालेल्या कालव्याची दुरुस्ती होईल.-सुधाकर कचकलवार, कार्यकारी अभियंता

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी