शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
4
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
5
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
6
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
7
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
8
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
9
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
10
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
11
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
12
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
13
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
14
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
15
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
16
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
17
"सिडकोच्या धरणात महायुतीचा १४०० कोटींचा घोटाळा; 'मेघा इंजिनिअरिंग' महालाभार्थी"; काँग्रेसचा आरोप
18
आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक
19
PKL 2024 : संघानं खूप 'भाव' दिला, आता करुन दाखवायचंय; यू मुंबाचा कर्णधार म्हणतो 'है तय्यार हम'
20
बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश

परभणी : पाच लाख हेक्टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 12:10 AM

जून महिन्यात एक-दोन वेळा झालेल्या समाधानकारक पावसावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ३ आॅगस्टपर्यंत ४ लाख ७० हजार ७९२ हेक्टरवर पेरणी केली; परंतु, जुलै महिन्यात २० दिवस पावसाने ताण दिल्याने पेरणी केलेल्या सर्वच क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर खरीप हंगाम हातचा जाण्याची भीती शेतकºयांना वाटत आहे.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जून महिन्यात एक-दोन वेळा झालेल्या समाधानकारक पावसावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ३ आॅगस्टपर्यंत ४ लाख ७० हजार ७९२ हेक्टरवर पेरणी केली; परंतु, जुलै महिन्यात २० दिवस पावसाने ताण दिल्याने पेरणी केलेल्या सर्वच क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर खरीप हंगाम हातचा जाण्याची भीती शेतकºयांना वाटत आहे.जिल्ह्यात खरीप हंगाम हा शेतकºयांची आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ७ लाख शेतकºयांची या हंगामावर भिस्त असते. हे शेतकरी दरवर्षी खरीप हंगामात दरवर्षी ५ लाख हेक्टवर पेरणी करतात. गतवर्षी जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली; परंतु, पावसाअभावी सोयाबीन, मूग, उडीद ही पिके हातची गेली. शेतकºयांची मदार ही कापूस पिकावर होती. मात्र कापूस पिकावर पहिल्याच वेचणीनंतर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविला. त्यामुळे शेतकºयांनी पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघालेला नाही. त्यामुळे गत खरीप हंगाम हा शेतकºयांना आर्थिक खाईत लोटणाराच ठरला. यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने ५ लाख २१ हजार ८७० हेक्टवर पेरणीेचे नियोजन केले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पेरता झाला. ३ आॅगस्टपर्यंत ४ लाख ७० हजार ७९२ हेक्टरवर पेरणी झाली आहे; परंतु, जुलै महिन्याच्या शेवटी व आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजेच सलग २० दिवस पावसाने जिल्ह्यात उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकºयांनी खरीपात पेरणी केलेली सोयाबीन, मूग, उडीद ही पिके करपून जात आहेत तर कापूस, तूर या पिकांची अवस्था बिकट झाली आहे. येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही तर पावणे पाच लाख हेक्टरवरील पिकांची अवस्था बिकट होणार आहे. परिणामी खरीप हंगाम शेतकºयांच्या हातून जाण्याची भिती निर्माण झाली आहे.२७१ मि.मी. पाऊसजिल्ह्यामध्ये ३ आॅगस्टपर्यंत २७१.९७ मि.मी. पाऊस झाला आहे. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ४० मि.मी.ने पाऊस कमी आहे. यामध्ये परभणी तालुक्यात २८२. ८२ मि.मी., पालम २२८.६४ मि.मी., पूर्णा ४५९.६ मि.मी., गंगाखेड २४४.७५ मि.मी., सोनपेठ २३५ मि.मी., सेलू २५०.२० मि.मी., पाथरी १९३.५० मि.मी., जिंतूर २५८.७६ तर मानवत २९५.०१ मि.मी. पाऊस झाला आहे. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जरी समाधानकारक असले तरी पावसाने सलग २० दिवस जिल्ह्यात उघडीप दिली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पिकांची परिस्थिती बिकट बनली आहे.नैसर्गिक संकटात सापडला शेतकरीजिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५८ हजार ८८ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. सध्या कापूस पीक वाढीच्या अवस्थेत आहे. कृषी विभागाकडून बोंडअळीच्या संकटाला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात क्रॉप सॅप अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक शेतकºयांच्या बांधावर जावून पिकांची पाहणी करीत आहेत. या पाहणीत अधिकाºयांना विदारक चित्र दिसून येत आहे. कापसाला बोंड येण्याआधीच पाकळ्यांमधूनच अळ्या बाहेर येत आहेत. त्यामुळे सद्य परिस्थितीत शेतकरी नैसर्गिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.पाच वर्षात एकच हंगाम चांगलाजिल्ह्यामध्ये २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामातून शेतकºयांच्या हाती काहीच लागले नाही. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. त्यानंतर शेतकºयांची अवस्था लक्षात घेता बँकांनी २०१६ मध्ये पीक कर्जाच्या माध्यमातून तब्बल १४०० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले. त्यानंतर शेतकºयांनी या पैशातून २०१६-१७ ची खरीप पेरणी केली. या हंगामात जूनपासूनच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांची पिके बहरली. त्यातून शेतकºयांनी विक्रमी उत्पादन घेतले; परंतु, बाजारपेठेत शेतकºयांना समाधानकारक भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक कोंडीत सापडले. शासनाला जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे लागले. त्यानंतर २०१७-१८ या खरीप हंगामात शेतकºयांनी ५ लाख हेक्टरवर पेरणी केली. त्यानंतर दोन महिने जिल्ह्यात एकही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी सोयाबीन, मूग, उडीद ही पिके करपून गेली. तर कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविल्याने शेतकºयांना उत्पन्न मिळाले नाही. २०१८-१९ च्या खरीप हंगामात आतापर्यंत ४ लाख ७० हजार ७९२ हेक्टरवर पेरणी झाली आहे; परंतु, सलग २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकºयांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस