लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या जिंतूर- परभणी रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने त्याचा फटका आता वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. राष्टÑीय महामार्गा म्हणून मान्यता मिळालेला हा रस्ता अक्षरश: चिखलाने माखला असून, जड वाहने देखील या रस्त्यावरुन घसरत असल्याने पाऊस पडल्यानंतर या मार्गावरील वाहतूकच धोकादायक बनली आहे.परभणी ते जिंतूर या ५० कि.मी. अंतराच्या रस्त्याला राष्टÑीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे साधारणत: वर्षभरात हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र कंत्राटदाराने धिम्या गतीने काम केले आणि कालांतरानेच कामच सोडून दिले. त्यामुळे रस्त्याच्या समस्या पूर्वीपेक्षा अधिक वाढल्या आहेत. सहा महिन्यापूर्वी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने नव्या कंत्राटदाराकडे हे काम सोपविले खरे; मात्र पावसाळा सुरू झाल्याने हे काम पूर्ण करण्यात अडथळे निर्माण होत आहेत.दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या समस्या चांगल्याच वाढल्या आहेत. सद्यस्थितीला झरी ते टाकळी आणि बोरी ते झरी हा रस्ता एका बाजूने पूर्णत: खोदून ठेवला असून, दुसऱ्या बाजूने याच रस्त्यावर मजबुतीकरणासाठी गिट्टी अंथरुन ठेवली आहे. त्यामुळे वाहनधारकांना खोदून ठेवलेल्या कच्चा रस्त्याचा वापर करावा लागत आहे. आधीच केलेला खड्डा त्यात काळी माती असणाºया या रस्त्यावर पाऊस झाल्याने अक्षरश: चिखल झाला आहे. काही भागात तर गुडघ्याइतके पाणी या रस्त्यावर आहे. त्यामुळे वाहतूक करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कंत्राटदाराने खोदकाम केलेल्या भागात दबई केली असती आणि पाणी काढून देण्याची व्यवस्था केली असती तर वाहनधारकांचा त्रास कमी झाला असता. मात्र या कामाकडे दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चक्क चिखलातून मार्ग काढावा लागत असून, काळ्या मातीमुळे वाहने रस्त्यावरुन घसरत आहेत. राष्टÑीय महमार्गाची ही अवस्था झाल्याने वाहनधारक जाम वैतागले आहेत.पन्नास कि.मी.साठी दोन तास४जिंतूर- परभणी रस्ता जागोजागी खोदून ठेवल्याने वाहनधारकांच्या समस्या वाढल्या आहेत. पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला असून, आठवडाभरातून तर या मार्गावरील दुचाकी वाहनांची वाहतूक चक्क बंद झाली आहे. सध्या केवळ चारचाकी वाहनेच या रस्त्यावरुन धावत असून, ५० कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी दोन तासांचा वेळ लागत आहे. नांदेड- औरंगाबाद या प्रमुख मार्गाला जोडणारा परभणी ते जिंतूर मार्ग असल्याने या मार्गावर वाहतूकही मोठी आहे. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.अनेकांनी बदलला मार्ग४दोन वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने अनेकांनी मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. नांदेडहून येणारी वाहने औरंगाबादकडे जाण्यासाठी परभणी- सेलू- देवगावफाटा मार्गे औरंगाबाद रस्ता गाठत आहेत.४हे अंतर परभणी- जिंतूर अंतरापेक्षा दूर असले तरी सेलू मार्गे औरंगाबाद रस्ता वाहतुकीयोग्य असल्याने याच मार्गाचा वापर केला जात आहे.
परभणी : रस्त्याची उडाली दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:14 AM