लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महार्गाावर तयार करण्यात आलेल्या दुभाजकाच्या जाळ्या तोडून ठिक ठिकाणी नागरिकांनी शॉर्टकट रस्ता शोधला आहे़ मात्र हा धोकादायक प्रकार अपघाताला आमंत्रण देणारा ठरू लागला आहे़विशेष म्हणजे, या प्रकाराकडे कोणत्याही विभागाचे लक्ष नाही़ त्यामुळे बिनधास्तपणे दुभाजकाच्या जाळ्यातून नागरिक मार्गक्रमण करीत असल्याचे दिसून येत आहे़कल्याण ते विशाखापटनम राष्ट्रीय महामार्ग ६१ हा पाथरी शहरातून जातो़ पाथरी शहराच्या सोनपेठ टी-पॉर्इंटपासून ते पोखर्णी फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर दुभाजक टाकण्यात आले आहेत़ परंतु, या दुभाजकावर खूप कमी आऊटसोर्स काढण्यात आले आहेत़ सोनपेठ टी पॉर्इंटपासून मोंढा परिसर, नाका परिसर, बसस्थानक आणि सेलू कॉर्नर परिसर असे चार आऊटसोर्स ठेवण्यात आले आहेत़ इतर ठिकाणी नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी ठिक ठिकाणी जाळ्यांची मोडतोड करून रस्ता शोधला आहे़; परंतु, हा प्रकार दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे़ पाथरी शहरातील हा एकमेव मुख्य रस्ता आहे़ याच रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग तसेच स्थानिक रहदारी आहे़ तसेच मोंढा परिसर ते सेलू कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावर मोठी बाजारपेठ आहे़ सेलू कॉर्नर परिसरात बसस्थानक, तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय व शहरातील प्रमुख शाळा, महाविद्यालये आहेत़ त्यामुळे रस्ता ओलांडणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे़ मुख्य रस्त्यावर दुभाजकाच्या जाळ्यांची मोडतोड करून नागरिक हमखास हा रस्ता ओलांडतात़ या गंभीर प्रकाराकडे प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष नाही़ त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
परभणी: दुभाजकाच्या जाळ्यातून शोधला रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 12:14 AM