लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : परभणीहून खळीमार्गे मैराळ सावंगी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाजवळच रस्ता खचला असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.गंगाखेड - परभणी रस्त्यावर खळी पाटी येथून खळी, ब्रह्मनाथ, चिंचटाकळी, गौंडगाव, मैराळ सावंगीमार्गे धारासूरकडे जाणाºया रस्त्यावर खळी गावालगत सोंड नदी वाहते. या नदीवर पूल टाकला असून गावाजवळच पावसाच्या पाण्याने हा रस्ता खचला आहे. रस्त्याच्या बाजुचा भराव दररोज खचत असल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक ठरत आहे. रस्त्यावर अनेक खड्डे असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास हा रस्ता वाहून जाण्याची भितीही निर्माण झाली आहे. खळीसह इतर गावांसाठी हा दररोजच्या वापरातील रस्ता असून रात्री-अपरात्री गावात येणे धोकादायक ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.बांधकाम विभागाचे दुर्लक्ष४खळी पाटी ते मैराळ सावंगी या रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या भागातील ग्रामस्थांनी खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी निवेदने दिली.४काही वेळा आंदोलनेही केली. मात्र बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच खळी गावालगत भराव खचून रस्ता धोकादायक झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा खळी येथील ओमकार पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
परभणी: खळी पुलाजवळ रस्त्याचा भराव खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:18 AM