लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : शहरातून झोला, पिंप्री मार्गे तालुक्यातील मसला गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील काम अर्धवट स्थितीत आहे़ त्यामुळे रखडलेल्या रस्ता कामामुळे मसला ग्रामस्थांना यातना सहन कराव्या लागत आहेत़ त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे़गंगाखेड येथून तालुक्यातील झोला, पिंप्रीमार्गे मसला गावाकडे जाण्यासाठी १३़६ किमी अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे़ हा रस्ता दुरुस्त व्हावा, यासाठी ग्रामस्थांनी उपोषणे, निवेदने व लोकप्रतिनिधींची भेट घेऊन साकडे घातले़ त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत हा रस्ता मंजूर करण्यात आला़ या कामासाठी ५ कोटी ८९ लाख १८ हजारांचा निधीही मंजूर करण्यात आला़विशेष म्हणजे आॅगस्ट २०१६ साली गंगाखेड ते मसला रस्त्याच्या कामाला संबंधित प्रशासनाने कार्यारंभ आदेश दिला़ त्यानंतर या रस्त्याच्या कामास संबंधित कंत्राटदाराने सुरुवात केली होती़ नोव्हेंबर २०१७ पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठीच्या सूचनाही याच कार्यारंभ आदेशात देण्यात आल्या होत्या़यामध्ये माती काम, खडी थर, मुरूम, डांबरी स्तर, पूर्णमिश्रीत कार्पेट व सिलकोट टाकून या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेणे अपेक्षित होते़ संथगतीने काम करणाºया गुत्तेदाराने मुरूमासाठी महसूल विभाग परवानगी देत नसल्याचा प्रश्न उपस्थित करून मध्यंतरीच रस्त्याचे काम बंद केले़ त्यानंतर १८ सप्टेंबर २०१७ साली मसला येथील ग्रामस्थांनी रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी करीत गावातील महारुद्र मंदिरासमोर उपोषण केले़त्यानंतर संबंधित गुत्तेदाराने रस्त्याचे काम सुरू केले़ त्यानंतर पुन्हा हे काम बंद केले़ त्यामुळे अद्यापपर्यंत या रस्त्याच्या कामाला मुर्त स्वरुप न मिळाले नाही.पाऊस झाल्याने मसला गावापासून ते पिंप्रीपर्यंतच्या रस्त्यावर पूर्णत: चिखल निर्माण होत आहे़ ग्रामस्थांना या चिखलातूनच मार्ग काढून गंगाखेड शहर गाठावे लागत आहे़ त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे़ अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे़प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष४गंगाखेड तालुक्यातील मसला येथील ग्रामस्थांना रहदारीसाठी सुलभ रस्ता व्हावा, यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाचे दार ठोठावले़ त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १३़५ किमी रस्त्याचे काम मंजूर करून त्यासाठी ६ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला़४संबंधित कंत्राटदाराच्या उदासिन भूमिकेमुळे मुदत संपूनही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही़ ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यानंतर संबंधित विभाग मात्र या रस्त्याच्या कामाला गांभिर्याने घेत नसल्यामुळेच रस्त्याचे काम रखडले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे़तीन वर्षापासून रखडलेल्या गंगाखेड-मसला या रस्त्याचे काम तात्काळ करण्याची मागणी वारंवार करूनही संबंधित गुत्तेदार व प्रशासन याची दखल घेत नाही़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देऊन मसला ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी़-छत्रपती शिंदे, माजी उपसरपंचमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील गंगाखेड ते मसला या रस्त्याचे काम मुदत संपूनही पूर्ण झालेले नाही़ हे काम पूर्ण करण्याच्या सूचना गुत्तेदाराला देवूनही गुत्तेदाराकडून काम करण्यास चालढकल होत आहे़ काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे विलंबासाठी दंड आकारण्याबाबतचे पत्र व्यवहार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहेत.-एमक़े़ खान, अभियंता
परभणी : ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:36 AM