लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): येथील पाणीपुरवठा विभागामध्ये अभियंतेच उपलब्ध नसल्याने सिंचन विहिरींच्या तांत्रिक मान्यता रखडल्या असून ऐन दुष्काळात जनतेची कामे ठप्प पडली आहेत.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी वाय.आय. खान हे ३ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. तेव्हापासून हा विभाग बेवारस बनला आहे. सिंचन विहिरींना तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार शाखा अभियंत्यांना नाहीत. परिणामी टंचाईच्या काळात ७१ सिंचन विहिरींचे प्रस्ताव दोन महिन्यांपासून रखडले आहेत. शिवाय टंचाईतील कामेही अधिकारी करीत नसल्याने बंद आहेत. लघू सिंचन विभागातही अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी ४ अभियंते असून एक महिन्यापासून एकही अभियंता कार्यालयात फिरकला नाही. गावागावामध्ये सिंचन विहीर व पाझर तलावावर अनाधिकृतपणे सुरू असलेल्या मोटारी काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही कारवाई मात्र होत नाही. प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकाºयांच्या आदेशालाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. पंचायत समितीमधील बांधकाम विभागातील चित्र अलबेल आहे. या विभागातील अभियंते बहुतांश वेळा उपलब्ध होत नाहीत. ग्रामीण भागात घरकूल व इतर कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कामांचे मोजमाप घेण्यासाठी परभणी व इतर ठिकाणी अभियंत्यांच्या निवासस्थानी जाऊन मोजमाप आणावे लागते. लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाºयांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात शाखा अभियंता अंबेकर वगळता एकही अभियंता कार्यालयाकडे फिरकत नाही. विशेष म्हणजे अनेक अभियंत्यांची कामे खाजगी व्यक्तीच करीत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. उपविभागीय पाणीपुरवठा विभागातही अभियंते उपलब्ध नसतात. नव्याने आलेले शाखा अभियंता बालाजी पाटील व शेषराव घुगे यांच्यावरच कार्यालयाची मदार आहे. कार्यालयातील अनेक कामे कंत्राटी अभियंतेच पाहत असल्याचे दिसून आले. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, लघू सिंचन विभाग, बांधकाम विभाग आणि पंचायत समिती विभागात एकूण २० अभियंते आहेत;परंतु, केवळ दोन ते तीन अभियंतेच नियमित कार्यालयात उपस्थित राहतात. परिणामी शासकीय कामकाज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचे चित्र जिंतूर तालुक्यात दिसत आहे.दौºयाचे दिले जाते कारण४तालुक्यातील लघू सिंचन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, पंचायत समितीमधील बांधकाम विभाग या विभागातील अभियंते बहुतांश वेळा कार्यालयात उपस्थित नसतात. तेथील अधिकाºयांकडे विचारणा केल्यानंतर अभियंते दौºयावर गेले आहेत, असे ठराविक उत्तर दिले जात आहे.पदभार घेण्यास अधिकारी उदासिन४ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत मनरेगाच्या सिंचन विहिरी व टंचाईची कामे प्रलंबित आहेत; परंतु, या विभागात पदभार घेण्यासाठी अधिकारी पुढे येत नाहीत.४परिणामी तालुक्यातील कामे दुष्काळी परिस्थितीतही रखडली आहेत. प्रशासनाने तातडीन पावले उचलून अभियंत्याचा पदभार इतर अधिकाºयांकडे द्यावा व खोळंबलेली कामे मार्गी लावावेत, अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांतून केली जात आहे.कार्यविवरण वह्या गायबविविध विभागातील अभियंत्यांनी दररोज कार्यालयात येऊन दौरा रजिस्टरवर स्वाक्षरी करणे व दररोजच्या कामाची नोंद कार्यविवरण रजिस्टरमध्ये करणे गरजेचे आहे; परंतु, एकाही कार्यालयात हे कार्यविवरण रजिस्टर पहावयास मिळत नाही. त्यामुळे अभियंत्यांचे फावत आहे.आठवड्यातून दोन दिवस अभियंते जिंतूरला येतात. त्यांनी दररोज जिंतूर येथे येऊन दौरा रजिस्टरला नोंद करणे आवश्यक आहे. मात्र असे होत नाही.अब्दुल शेख,प्रभारी गटविकास अधिकारी, जिंतूर
परभणी : अभियंत्यांअभावी रखडला कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:18 AM