लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील २ लाख ५४ हजार ५८९ शेतकऱ्यांना आतापर्यंत १८१ कोटी ४६ लाख ५६ हजार रुपयांचे गतवर्षीच्या खरीप हंगामाचे दुष्काळी अनुदान वाटप करण्यात आले असून, आणखी २३ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे नोंदविली आहे़खरीप २०१८ च्या हंगामात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़ त्यामुळे जिल्ह्यातील ४७९ गावांमधील ३ लाख ४३ हजार ५८६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते़ त्यामुळे राज्य शासनाने ४७९ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली होती़ या दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकºयांना दुष्काळी अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता़ त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ४७९ गावांमधील २ लाख ५४ हजार ५८९ शेतकºयांना १८१ कोटी ४६ लाख ५६ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील १३१ दुष्काळग्रस्त गावांमधील ६८ हजार १४९ शेतकºयांना ५४ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे़ पालम तालुक्यातील ८२ गावांमधील ४० हजार ७६७ शेतकºयांना २२ कोटी ५२ लाख ६४ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून, पाथरी तालुक्यातील ५८ गावांमधील ३७ हजार १०१ शेकºयांना २४ कोटी ३९ लाख ४६ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आाहे़ मानवत तालुक्यातील ५४ गावांमधील ३२ हजार २६६ शेतकºयांना २४ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले असून, सोनपेठ तालुक्यातमील ६० गावांमधील २७ हजार ५७९ शेतकºयांना २० कोटी ४१ लाख ८० हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे़ सेलू तालुक्यातील ९४ गावांमधील ४८ हजार ७२७ शेतकºयांना ३५ कोटी ३३ लाख ५८ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे़आणखी २३ कोटी ५६ लाखांची गरज४जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत १८१ कोटी ४६ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले असले तरी आणखी जिल्ह्यातील ८४ गावांसाठी २३ कोटी ५६ लाख ६ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील १९ गावांसाठी ७६ लाख २१ हजार, पालम तालुक्यातील २४ गावांसाठी ६ कोटी ७ हजार, पाथरी तालुक्यातील १४ गावांसाठी ८ कोटी ९० लाख, मानवत तालुक्यातील ४ गावांसाठी २ कोटी, सोनपेठ तालुक्यातील ४ गावांसाठी ५४ लाख ८० हजार, सेलू तालुक्यातील १९ गावांसाठी ५ कोटी २७ लाख २५ हजार रुपयांची आवश्यकता आहे, तशी मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे नोंदविली आहे़
परभणी : १८१ कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:23 PM