लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : पाथरी मतदार संघातील मानवत, सोनपेठ, पाथरी व परभणी या चार तालुक्यातील रस्ते, पूल उभारणी व सुधारण्याच्या कामासाठी नाबार्ड व अर्थसंकल्पातून ३० कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आ. मोहन फड यांनी दिली.मानवत तालुक्यातील केकरजवळा, पाथरी तालुक्यातील मुद्गल, वाघाळा व विटा तसेच सोनपेठ तालुक्यातील आवलगाव, वंदन प्रजिमा १८ या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी नाबार्ड २३ अंतर्गत ११ कोटी ८९ लाख रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. या निधीमधून मानवत व सोनपेठ तालुक्यातील २३ कि.मी. लांबीचे रस्ते व पुलांचे काम होणार आहे. सोनपेठ तालुक्यातील विटा, वाघाळा, लासिना, थडी उक्कडगाव, गंगापिंपरी, लोहीग्राम, इतर जिल्हा मार्ग २५ साठी नाबार्ड २३ मधून ६ पुलांची कामे करण्यासाठी ७ कोटी ४१ लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे. २०१८-१९ या अर्थसंकल्पातून कोल्हा-वालूर, चारठाणा या राज्य मार्ग २५३ रस्त्यासाठी ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याच बरोबर परभणी तालुक्यातील गव्हा, सय्यद मियाँ पिंपळगाव, पेडगाव, आळंद, मांडाखळी या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मानवत तालुक्यातील देवलगाव आवचार, सावरगाव, पाळोदी या १० कि.मी. रस्त्याच्या कामास २ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे. या कामाच्या अंदाजपत्रकास लवकरच सुरुवात होणार आहे. आ. मोहन फड यांनी पाठपुरावा करुन राज्य शासनाकडून रस्ते व पुलांसाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. त्यामध्ये सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठावरील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार असून दळणवळणाच्या वाहतुकीची सोय होणार असल्याची माहिती आ. फड यांनी दिली.
परभणी : रस्त्यांसाठी ३० कोटी रुपये मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:16 AM