शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

परभणी : गारपीट नुकसानीसाठी ५८ कोटी रुपयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:43 AM

दोन आठवड्यापूर्वी जिल्ह्यात गारपीटीने शेती पिके आडवी झाली होती. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, ६६ हजार ८८३ हेक्टरवरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ५८ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे नोंदविली आहे.

प्रसाद आर्वीकर।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन आठवड्यापूर्वी जिल्ह्यात गारपीटीने शेती पिके आडवी झाली होती. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, ६६ हजार ८८३ हेक्टरवरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ५८ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे नोंदविली आहे.११, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. निसर्गाच्या या संकटात हातातोंडाशी आलेली पिके हातची गेली होती. त्यामुळे शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. पहिल्या दिवशी जिंतूर आणि सेलू तालुक्यात, दुसºया दिवशी परत सेलू, पूर्णा तालुक्यात आणि त्यानंतर गंगाखेड, पालम, सोनपेठ या तालुक्यात गारपीटीने थैमान घातले होते. रबीचा हंगाम अंतिम चरणात आहे. गहू, ज्वारी ही पिके वाढीस लागली होती तर हरभरा काढणीला आला होता. गारपीटीने ही सर्व पिके आडवी झाली. तसेच बागायती आणि फळ पिकांनाही गारपीटीचा फटका सहन करावा लागला होता.जिल्हा प्रशासनाने गारपीट झाल्यानंतर लगेच प्राथमिक अहवाल नोंदवित प्रत्यक्ष पंचनाम्यांनाही सुरुवात केली होती. हे पंचनामे पूर्ण झाले असून, २२ फेब्रुवारी रोजी अंतिम अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. या अहवालानुसार सेलू, सोनपेठ, गंगाखेड आणि जिंतूर या चार तालुक्यातील ३० हजार १८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकºयांना मदत देण्यासाठी २५ कोटी १० लाख रुपयांची आवश्यकता लागणार आहे. त्याचप्रमाणे सेलू, सोनपेठ, गंगाखेड, पालम आणि पूर्णा या पाच तालुक्यात ३६ हजार ६७८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, नुकसान भरपाईसाठी ३३ कोटी २२ लाख रुपयांची आवश्यकता लागणार आहे. तालुकानिहाय नुकसानीसह लागणाºया नुकसान भरपाई रकमेची मागणी जिल्हा प्रशासनाने नोंदविली आहे. त्यामुळे राज्य शासन आता प्रत्यक्षात किती नुकसान भरपाई देते, याकडे लक्ष लागले आहे.पालम तालुक्यात सर्वाधिक नुकसान४जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी केलेल्या प्रत्यक्ष पंचनाम्यामध्ये पालम तालुक्यात गारपीटीने पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे.४या तालुक्यातील २४ हजार ९२८ हेक्टरवरील पिके गारपीटीच्या भक्ष्यस्थानी पडली. विशेष म्हणजे, या सर्व पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, त्यासाठी २१ कोटी ८२ लाख रुपयांची मागणी नोंदविण्यात आली. त्या खालोखाल गंगाखेड तालुक्यामध्ये १५ हजार ५०५ हेक्टर क्षेत्रावरील पिके गारपीटीने आडवी झाली. या पिकांचे ३३ ते ५० टक्क्यांपर्यंतचे नुकसान झाले आहे. त्यासाठी १३ कोटी २९ लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नोंदविली आहे.