लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): शेतकºयांना अनुदानावर देण्यात येणाºया पाईप आणि विद्युत मोटारीसाठी ५ नोव्हेंबर रोजी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता; परंतु, या लकी ड्रॉच्या याद्यांमध्ये कर्मचाºयांच्या चुकांमुळे अनेक शेतकºयांची नावेच नसल्याने संतप्त शेतकºयांनी एक खिडकी कार्यालयात गोंधळ घालून झालेल्या ड्रॉच्या याद्या फाडल्या.राष्टÑीय अन्न सुरक्षा अभियान गळीत धान्य योजनेत शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर पाईप आणि विद्युत मोटार देण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत तालुक्यातील शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी करून एक खिडकी कार्यालयाकडे विद्युत मोटारीसाठी ४५८ तर पाईपसंचासाठी ५४६ अर्ज दाखल केले होते. या दोन्ही साहित्यांसाठी जवळपास १ हजार प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले होेते. कृषी विभागाच्या एक खिडकी कार्यालयाने दाखल प्रस्तावांची छाननी करून ५ नोव्हेंबर रोजी विद्युत मोटार आणि पाईपासाठी शेतकºयांच्या नावाचा लकी ड्रॉ काढण्यात आला. यावेळी २०० पेक्षा अधिक शेतकरी ड्रॉसाठी हजर होते. मात्र याद्यांमध्ये नावेच नसल्याने ड्रॉच्या चिठ्यातही अनेक शेतकºयांची नावे आली नाहीत. त्यावरून गोंधळ सुरू झाला. ड्रॉ काढणाºया अधिकाºयांना झालेली चूक लक्षात आली. गोंधळाच्या वातावरणात शेतकºयांनी लकी ड्रॉ बंद पाडला. तर काही शेतकºयांनी विद्युत मोटारीसाठी काढलेल्या २६ शेतकºयांच्या याद्याच फाडून टाकल्या. त्यामुळे उपस्थित अधिकाºयांना घाम फुटला. त्यामुळे ५ नोव्हेंबर रोजीची सोडत गोंधळात रद्द करण्यात आली.
परभणी : संतप्त शेतकऱ्यांनी फाडल्या याद्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:29 AM