लोकमत न्यूज नेटवर्कगौर : देशासमोर पर्यावरणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे़ या पर्यावरणाच्या रक्षणार्थ शहीद वनरक्षक सदाशिव नागठाणे यांनी स्वत:च्या प्राणाचे बलीदान दिले, असे भावोद्गार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले़तालुक्यातील गौर येथील वन शहीद सदाशिवआप्पा नागठाणे यांच्या श्रद्धांजली सभेत मुनगंटीवार बोलत होते़ प्रारंभी मुनगंटीवार यांनी शहीद नागठाणे यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले़ यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख रुपयांचा धनादेश अर्चना नागठाणे यांना सुपूर्द केला़ तसेच महाराष्ट्र वनखात्यातील औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली येथील कर्मचाºयांनीही अर्थसहाय्य देऊन मदत केली़ शहीद नागठाणे यांच्या पत्नीला वनखात्यात नोकरीचे नियुक्तीपत्रही दिले़ यावेळी वन विभागाचे सचिव विकास खार्गे, जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, आ़ मोहन फड, माजी आ़ विजय गव्हाणे, दिलीप कुंदकुर्ते, विठ्ठलराव रबदडे, भाजप जिल्हाध्यक्ष अभय चाटे, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, प्राचार्य मोहनराव मोरे, गणेशराव रोकडे, बाजार समिती सभापती बालाजी देसाई, बाळासाहेब कदम, डॉ़ अजय ठाकूर, सरपंच चांगुना अनंता पवार, उपजिल्हाधिकारी डॉ़ संजय कुंडेटकर, तहसीलदार श्याम मदनूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दुल गणी खान, पोलीस निरीक्षक कर्डक, वन खात्याचे भंडारी, प्रादेशिक मुख्य वन संरक्षक प्रकाश महाजन, सामाजिक वन विभागाचे नि़ब़ बुदगे, परभणी येथील डोंगरे, केशव बाबळे, डाखोरे यांची उपस्थिती होती़कमान व रस्त्यासाठी ५० लाखांचा निधी४शहीद सदाशिवआप्पा नागठाणे यांच्या नावाने गौर येथे प्रवेशद्वार आणि गावातील एका मुख्य रस्त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा यावेळी राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली़ वन खात्याच्या वतीने आयोजित श्रद्धांजली कार्यक्रम प्रसंगी मुनगंटीवार बोलत होते़
परभणी : पर्यावरण रक्षणासाठी नागठाणे यांचे बलीदान-सुधीर मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 1:06 AM