लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : माजी खा़ प्रा़ अशोकराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ परभणीत रविवारी पार पडलेल्या निकाली कुस्ती स्पर्धेत पुणे येथील मामा मोहोळ तालीम संघाचा मल्ल अक्षय शिंदे हा राज्यस्तरावरील परभणी चषकाचा मानकरी ठरला़ त्यास १ लाख ५१ हजार रुपये रोख, बुलेट मोटारसायकल, एक किलो वजनाची चांदीची गदा आणि परभणी चषक हा किताब प्रदान करण्यात आला़ तर पुणे येथील गोकुळ वस्ताद तालीम संघाचा मल्ल सागर बिराजदार हा मराठवाडास्तरावर घेतलेल्या मराठवाडा चषकाचा मानकरी ठरला़ त्यास बुलेट मोटारसायकल आणि गदा देऊन सन्मानीत करण्यात आले़या स्पर्धेत राज्यस्तराच्या गटात ज्ञानेश्वर गोचडे उपविजेता ठरला असून, त्यास १ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले तर मराठवाडास्तराच्या स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या बीडच्या गोकूळ आवारे यास ३१ हजार रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले़ १० तास चाललेल्या या स्पर्धेमध्ये ९ लाख रुपयांच्या बक्षीसांची लयलूट करण्यात आली़ राज्यभरातील सुमारे २०० स्पर्धक सहभागी झाले होते़१० तास चाललेल्या या स्पर्धांना प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली़ रात्री ११ वाजेच्या सुमारास अंतीम सामने पार पडले़ त्यानंतर अ़भा़ काँग्रेसचे सरचिटणीस खा़ अॅड़ राजीव सातव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री सुरेश वरपूडकर, स्पर्धेचे आयोजक रविराज देशमुख, माजी खा़ तुकाराम रेेंगे, अतिक उर रहेमान खान, सुशील देशमुख, जिंतूरचे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, पंजाबराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, विखार अहेमद खान आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिस वितरित करण्यात आले़ यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक प्रा़ डॉ़ बंकट यादव यांचा सत्कार करण्यात आला़ स्पर्धा यशस्वीतेसाठी सिद्धार्थ जंगले, केदार कान्हेकर, गजानन जाधव, रामा देशमुख, संजय संघई, रितेश देशमुख, सखाराम कुरूंदकर, स्पर्धा संयोजक प्रा़ डॉ़ माधव शेजूळ, प्रा़ डॉ़ अभिजीत कंडेरे, प्रा़ भालचंद्र पवार आदींनी प्रयत्न केले़आॅलम्पीकच्या तयारीसाठी ५० हजारांचे बक्षीससिडनी आॅलम्पीक स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवारे (बीड) याला जीवनज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रोख ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले़ कार्यक्रमात प्रशिक्षक रणधीरसिंग पोंगल यांचा सत्कार करण्यात आला़ तसेच परभणीचा मल्ल अर्जुन अनिल डिघोळे व राजेश पोले यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत कास्य पदक मिळविल्याबद्दल रोख ३ हजार रुपये व स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला़
परभणी : सागर बिराजदार, अक्षय शिंदे चषकाचे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:33 AM