लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागाला १५ दिवसांपासून कर्मचारी नसल्याने अर्ज घेऊन येणाऱ्या वृद्धांना माघारी फिरावे लागत आहे. हा विभाग निराधार झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.दुसरीकडे आर्थिक दुर्बल निराधार घटकातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेतील हजारावर प्रकरणे मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत. आचारसंहितेमुळे या संबंधी बैठक होत नसल्याने वृद्ध निराधार लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात खेटा माराव्या लागत असल्याने वृद्ध त्रस्त झाले आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या विशेष योजनेंर्गत निराधार घटकासाठी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना या दोन राज्य सरकारच्या, इंदिरा गांधी राष्टÑीय अपंग निवृत्ती वेतन योजना आणि राष्टÑीय कुटुंब अर्थसहाय्य योजना या केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी वृद्ध मोठ्या प्रमाणावरे अर्ज करतात. मागील तीन महिन्यांपासून ५०० च्या वर प्रस्ताव निराधारांनी दाखल केले आहेत. मात्र तहसील कार्यालयाकडून प्रस्तावाचा निपटारा होत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे निराधारांना आर्थिक फटक्यासह त्रास सहन करावा लागत आहे. तसेच संजय गांधी निराधार विभागाला मागील १५ दिवसांपासून कर्मचारी नसल्याने या विभागाचे काम ठप्प झाले आहे. मागील प्रस्ताव धुळखात पडले असताना नवीन प्रस्ताव दाखल करण्यासाठी येणाºया वृद्धांना आल्या पावली परत जावे लागत असल्याने अर्जदारातून नाराजी व्यक्त केली जात आहे. या विभागाला एस.एम. स्वर्णकार यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली आहे. बदली झाल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांची बदली मानवत तहसील कार्यालयात झाली मात्र अद्यापही या विभागाला कर्मचारी न मिळाल्याने कामकाज बंद पडले आहेआचारसंहितेचा : बसला फटका४संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना या दोन राज्य सरकारच्या व इंदिरा गांधी राष्टÑीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्टÑीय अपंग निवृत्ती वेतन योजना आणि राष्टÑीय कुटुंब अर्थसहाय्य योजना या केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी शेकडो अर्जदारांनी अर्ज केले आहेत. मात्र मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागली होती.४२६ मे रोजी आचारसंहिता संपली होती. निराधारांचे प्रस्ताव मार्गी लागतील, अशी आशा होती. मात्र त्यातच नगरपालिकाची पोटनिवडणूक असल्याने आचारसंहिता सुरु झाली आहे. २४ जूनला मतमोजणी होणार असून आचारसंहिता संपणार आहे, यानंतर बैठकीचे आयोजन करून अर्जाचा निपटारा करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार डी.डी. फुफाटे यांनी दिली.संजय गांधी निराधार योजनेसाठी नियुक्त असलेल्या कर्मचाºयाची बदली झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दोन कर्मचारी उपलब्ध झाले असून या पैकी एका कर्मचाºयाकडे तातडीने हा विभाग देण्यात येणार आहे.-डी.डी. फुफाटे, तहसीलदार मानवत
परभणी : संजय गांधी योजनेचा विभाग झाला निराधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:51 PM