शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

परभणी : जोतिबांबरोबर सावित्रीबार्इंचाही पुतळा उभारा -छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:40 AM

महात्मा जोतिबा फुले यांच्या बरोबरच क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांचे कार्य अतुलनीय आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या महिला यशस्वीपणे काम करीत आहेत, त्या केवळ सावित्रीबाई फुले यांच्याच दूरदृष्टीच्या शैक्षणिक योगदानामुळे. त्यामुळे जोतिबांबरोबरच सावित्रीबाई फुले यांचाही पुतळा बाजूला उभा करा, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा जोतिबा फुले यांच्या बरोबरच क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांचे कार्य अतुलनीय आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या महिला यशस्वीपणे काम करीत आहेत, त्या केवळ सावित्रीबाई फुले यांच्याच दूरदृष्टीच्या शैक्षणिक योगदानामुळे. त्यामुळे जोतिबांबरोबरच सावित्रीबाई फुले यांचाही पुतळा बाजूला उभा करा, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे बोलताना केले.परभणी महानगरपालिकेच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमजवळ क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन आणि सुशोभीकरण कामाचे छगन भुजबळ यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, महापौर मीनाताई वरपूडकर, जि.प. अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, माजीमंत्री सुरेश वरपूडकर, समता परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा मंजिरी घाडगे, अनिल गोरे, माजी आ. सुरेश देशमुख, आ.रामराव वडकुते, महानगराध्यक्ष स्वराजसिंह परिहार, माजी महापौर प्रताप देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, ज्या काळात मुलींनी शिक्षण घेणे म्हणजे पाप मानले जात होते, त्या काळात प्रचंड यातना सहन करुन सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. प्रास्ताविकात माजी महापौर प्रताप देशमुख यांनी २००६ मध्ये या ठिकाणी पुतळ्याची जागा आपण निश्चित केली होती; परंतु, नंतर काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे पुतळा उभारण्याच्या कामात दिरंगाई झाल्याचे सांगितले. आभार माजी उपमहापौर भगवान वाघमारे यांनी मानले. सूत्रसंचालन नगरसेवक बंडू पाचलिंग यांनी केले.‘तीन महिन्यांत पुतळ्याचे काम पूर्ण करणार’४बहुजन जागृती समता मेळाव्यात, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलताना माजी मंत्री सुरेश वरपूडकर म्हणाले की, मनपाच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. याच अनुषंगाने बोलताना आ.बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, सकाळी पुतळा सुशोभीकरण उद्घाटन कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याबरोबरच सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्याची केलेली मागणी पूर्ण करण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला असून तीन महिन्यांत दोन्ही पुतळे उभारले जातील, असे ते म्हणाले. याबाबतच बोलताना आ.रामराव वडकुते यांनी पुतळ्यांच्या कामासाठी ५ लाख रुपयांचा निधी देत असल्याचे जाहीर केले.

टॅग्स :parabhaniपरभणीChagan Bhujbalछगन भुजबळ