शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

परभणी : २८ लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 12:56 AM

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व दस्तऐवजांचे डिजीटलायझेशन केले जात असून त्यांतर्गत या कार्यालयातील २८ लाख ५२ हजार ४७५ कागदपत्रांचे स्कॅनिंगचे काम पूर्ण झाले आहे. आता या कागदपत्रांची विभागनिहाय नोंदणी व तपासणी केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व दस्तऐवजांचे डिजीटलायझेशन केले जात असून त्यांतर्गत या कार्यालयातील २८ लाख ५२ हजार ४७५ कागदपत्रांचे स्कॅनिंगचे काम पूर्ण झाले आहे. आता या कागदपत्रांची विभागनिहाय नोंदणी व तपासणी केली जात आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कारभार आॅनलाईन करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यातील महत्वाचा टप्पा म्हणजे या कार्यालयात उपलब्ध असलेले सर्व रेकॉर्ड संगणकावर घेतले जात आहेत. त्यासाठी कार्यालयातील सर्व विभागातील कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्याचे काम सहा महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले. यासाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित करुन २० स्कॅनरच्या सहाय्याने कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्यात आले. सद्यस्थितीला जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांमधील २८ लाख ५२ हजार ४७५ कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. एकूण ६१ हजार ३१ संचिका स्कॅन करण्यात आल्या असून या संचिकांचे मेटाडेटा करण्याचे कामही केले जात आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागांतर्गत २ लाख ५३ हजार २१५, भूसुधार विभागांतर्गत ६ लाख ९२ हजार ४४७, विशेष भूसंपादन विभागातील ३ लाख २६ हजार ५५०, उपविभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या भूसंपादन विभागातील ४ लाख २६ हजार ३०१, अपील विभागातील २ लाख १३ हजार ७१, गृहशाखेतील १ लाख ३६ हजार ६६७, रजिस्टर विभागातील २१ हजार ९११, उर्दू रजिस्टर विभागातील ४० हजार ४८१, उर्दू विभागातील ५ लाख ३ हजार ८५० आणि पूनर्वसन विभागातील २ लाख ३७ हजार ९८२ कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे.या कागदपत्रांमध्ये भूसुधार विभागाच्या सर्वाधिक १४ हजार ६६६ संचिकांचे स्कॅनिंग झाले आहे. त्याच प्रमाणे पूनर्वसन विभागातील १२ हजार ४९९, महसूल विभागातील ९ हजार ६९३, भूसंपादन एसडीओ विभागातील ७ हजार ७४७, उर्दूच्या ५ हजार ५०४, गृह शाखेतील ४ हजार २२७, अपिलातील ३ हजार ९०४, विशेष भूसंपादन २ हजार २७२, रजिस्टर आॅफीस (उर्दू) मधील २८१ आणि रजिस्टर आॅफीसमधील २३८ संचिकांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ५० वर्षापूर्वीचेही दस्तऐवज उपलब्ध आहेत.हे दस्तऐवज जीर्ण अवस्थेत असून ते संगणकावर आल्याने या दस्ताऐवजांचे आयुष्यमान वाढले आहे, विविध कामांसाठी नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयातून दस्तऐवज घ्यावे लागतात. ही प्रक्रिया आॅनलाईन करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाने केला असून सर्व दस्ताऐवजांचे स्कॅनिंग व तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर एका क्लिकवर दस्ताऐवज उपलब्ध करुन देण्याची सुविधा जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करणार आहे. त्यासाठीची ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.मॉडर्न रेकॉर्ड रुमची निर्मिती४जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अभिलेखांचे सूचिबद्ध संगणकीकरण करुन मॉडर्न रेकॉर्ड रुम तयार केली जाणार आहे. यासाठी मे.सेरीसतेक सोल्यूशन प्रा.लि.पुणे या कंपनीला अभिलेखे स्कॅन करण्याचे काम दिले असून ते पूर्णही झाले आहे. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले जात आहे. अभिलेखापाल सुरेश पुंड व इतर कर्मचारी यासाठी सहकार्य करीत आहेत.स्कॅनिंग कागदपत्रांची फेरतपासणी सुरुजिल्हाधिकारी कार्यालयातील २८ लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग झाले असून ही कागदपत्रे ज्या त्या विभागाला स्कॅन केलेल्या स्थितीत पीडीएफ फॉरमॅटमध्ये दिली जात आहेत. संबंधित विभागप्रमुखांनी सर्व कागदपत्रांच्या इमेजची तपासणी करावयाची आहे. त्यात स्कॅन केलेली इमेज फिकट नसावी, मूळ अभिलेखाचा सर्व भाग स्कॅन इमेजमध्ये दिसणे आवश्यक आहे. स्कॅन केलेली इमेज तिरकी असू नये, अंधुक असू नये, लिखित भागाशिवाय अन्य कोणत्याही रेषा किंवा डाग असू नये आदी बाबींची तपासणी केली जाणार आहे. असा प्रकार आढळल्यास ती इमेज डिलीट करुन पुन्हा नव्याने स्कॅन केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक कार्यालयातील विभाग प्रमुखांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात इनामी, धर्मादाय, कूळ, सीलिंग, अकृषिक, गोपनीय शाखा, पुनर्वसन, विशेष भूसंपादन, भूसंपादन समन्वय, अपील, करमणूक कर, उर्दू अभिलेखे आदी संदर्भातील कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.१५ दिवसांच्या आत ही तपासणी पूर्ण करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारी