लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातील ब्रह्मनाथ येथील एकाच विद्यार्थ्याच्या शाळेचे प्रकरण ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन ही शाळा बंद करून या शाळेचे समायोजन खळी तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.ब्रह्मनाथ येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या एकाच विद्यार्थ्यासाठी तीन शिक्षक नियुक्तीला असल्याची बाब दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने उजेडात आणली. एकीकडे २० पेक्षा कमी पटसंख्या असणाºया शाळा बंद करण्याचे धोरण जिल्हा परिषदेने आखले असताना ब्रह्मनाथ येथील शाळेत मात्र एका विद्यार्थ्यासाठी तीन शिक्षक नियुक्तीला असल्याने या अजब प्रकाराविषयी तालुक्यात चर्चा होत होती.शिक्षण विभागाने तालुक्यातील पांढरीमाती तांडा येथील जिल्हा परिषद शाळेबरोबरच इतर शाळांचे नजिकच्या शाळांमध्ये समायोजन केले. पांढरी माती तांडा जि.प. शाळेत २४ विद्यार्थी संख्या होती. असे असतानाही या शाळेचे समायोजन करण्यात आले. तर दुसरीकडे ब्रह्मनाथ येथील जिल्हा परिषद शाळेत केवळ एक विद्यार्थी शिकत असतानाही ही शाळा सुरू ठेवण्यात आली. विशेष म्हणजे या एका विद्यार्थ्याला शिकविण्यासाठी दररोज वेगवेगळ्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर ‘लोकमत’ने २० जानेवारीच्या अंकात ‘एकाच विद्यार्थ्यासाठी चालते शाळा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलली. २१ जानेवारी रोजी गटशिक्षणाधिकारी निलपत्रेवार यांनी दिवसभर शाळेत बसून तपासणी केली. त्यानंतर २२ जानेवारी रोजी शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनीही शाळेला भेट दिली. या शाळेत तिसरी वर्गात शिकणाºया एकमेव विद्यार्थी असलेल्या कृष्णा उद्धव कºहाळे यास व त्याच्या पालकांना शाळेत बोलावून चर्चा केली. या विद्यार्थ्याचे समायोजन इतर शाळेमध्ये करण्याबाबत एकमत घडवून आल्यानंतर कृष्णा कºहाळे या विद्यार्थ्याचे समायोजन खळी येथील जिल्हा परिषद शाळेत करून तसा अहवाल कार्यालयास सादर करावा, अशा सूचना शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी केंद्रप्रमुख एम.एच. चव्हाण यांना दिल्या आहेत. त्यामुळे अखेर ब्रह्मनाथ शाळेचे समायोजन खळी जि.प. शाळेत करण्याचा निर्णय झाला आहे.शिक्षण विभागाने येथील विद्यार्थ्याचे इतर ठिकाणी समायोजन केले असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून ब्रह्मनाथ येथील जि.प. शाळा सुरू आहे. शिक्षण विभागाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील १० शाळा बंद केल्या. त्यावेळी या शाळेची माहिती लपवून ठेवण्यात आली होती.त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील शिक्षणप्रेमी नागरिकातून होत आहे.जि.प. शाळेच्या गुणवत्तेवर पांघरूनब्रह्मनाथ येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये यापूर्वी विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक होती. चांगल्या भौतिक सुविधाही या शाळेत उपलब्ध आहेत; परंतु, शैक्षणिक गुणवत्ता नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीला सुरूवात झाली. गावात जिल्हा परिषदेची शाळा असतानाही या गावातून अनेक विद्यार्थी इतर ठिकाणी जिल्हा परिषदेच्या किंवा खाजगी संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी माहिती घेतली तेव्हा ब्रह्मनाथ शाळेमध्ये हजेरीपटावर ३ विद्यार्थ्यांची नोंद होती. त्यातील २ विद्यार्थी शाळेत येत नसल्याची माहिती मिळाली. केवळ शैक्षणिक गुणवत्ता नसल्यानेच ब्रह्मनाथ येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. शिक्षण विभाग विद्यार्थ्याचे समायोजन करून मोकळा झाला असला तरी विद्यार्थी संख्या घटण्यास जबाबदार असणाºयांवर मात्र सोयीस्कर पांघरून टाकण्यात आले आहे.
परभणी : ब्रह्यनाथ येथील शाळा जि.प. करणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 1:05 AM