मोहन बोराडे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकवित असतानाच विद्यार्थ्यांमधून एक चांगला सुजाण नाग्रिक घडावा, या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारचे ४२ उपक्रम राबवून पार्डी येथील जिल्हा परिषद शाळेने आपले वेगळेपण जोपासले आहे. त्यामुळेच शाळेची विद्यार्थी संख्या वाढली आहे.सेलू तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या पार्डी गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा कार्यरत आहे. या गावातील बहुतांश ग्रामस्थ ऊसतोडीसाठी जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागले. त्यातूनच येथील शिक्षकांनी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेत रमविण्याचे काम सुरू केले. ‘आनंदाचं झाड’ ही मध्यवर्ती संकल्पना समोर ठेवून ४२ विविध उपक्रमांची रुजूवात केली. परिणामी ऊसतोडीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटविण्यात शिक्षकांना यश आले. त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, महिला, पालक मेळाव्याच्या माध्यमातूून लोकसहभाग वाढविला. शाळा डिजिटल करण्यात आली. विद्यार्थ्यांना दिले जाणारे समजपूर्वक शिक्षण व गुणवत्ता पाहून पालकही शाळेकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागले. सरपंच अश्विनी राठोड यांनी विशेष लक्ष देऊन भौतिक सुविधा वाढविल्या. त्यात सुसज्ज वाचनालय, वॉटर फिल्टर, सोलार सिस्टीम, हॅन्डवॉश स्टेशन, शाळेची रंगरंगोटी केली. या माध्यमातून शाळेचं रुप बदलले.आनंदाचं झाड फेसबुक पेजशाळेने तयार केलेल्या आनंदाचं झाड या फेसबुक पेजची दखल राज्यातील शिक्षणप्रेमी, साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञांनीही घेतली आहे. शाळेत राबविलेल्या उपक्रमातून येथील विद्यार्थ्यांनी अ.भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमख यांची प्रकट मुलाखतही घेतली आहे.
परभणी: विविध उपक्रम राबविणारी शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 11:50 PM