लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेतील विविध संवर्गातील १ हजार ८७ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय ११ सप्टेंबर रोजी झालेल्या महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला़येथील बी़ रघुनाथ सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेला प्रारंभ झाला़ यावेळी उपमहापौर माजू लाला, आयुक्त रमेश पवार, नगरसचिव विकास रत्नपारखे यांची प्रमुख उपस्थिती होती़राज्य शासनाच्या २ आॅगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार महापालिकेतील अधिकारी, कर्मचाºयांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासंदर्भातील ठराव सभेसमोर ठेवण्यात आला़ जलालोद्दीन काजी, सभागृह नेते भगवान वाघमारे, विरोधी पक्षनेते विजय जामकर, स्थायी समितीचे सभापती सुनिल देशमुख, नगरसेवक प्रशास ठाकूर, अमोल पाथरीकर, विकास लंगोटे आदींनी या ठरावास मंजुरी दिली़या ठरावावर चर्चा करताना सभागृह नेते भगवान वाघमारे म्हणाले, सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर कर्मचाºयांच्या वेतनावरील खर्चावर ६९ लाख रुपयांनी वाढ होणार आहे़ त्यामुळे शासनाने एलबीटीपोटी ३ कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, असा ठरावही मंजूर करण्यात आला़दरम्यान, कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याचा ठराव मंजूर झाल्यानंतर सभागृहाबाहेर महापालिकेतील कर्मचारी आणि कर्मचारी संघटनेचे नेते केक़े भारसाखळे, अनुसयाबाई जोगदंड, आनंद मोरे, बाबाराव आघाव आदींनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला़यंत्रणेकडून उद्यानाचा विकास४शहरातील राजगोपालाचारी उद्यान बाह्य यंत्रणेमार्फत चालविण्यास देण्याचा ठरावही या सभागृहात मंजूर करण्यात आला़ आयुक्त रमेश पवार म्हणाले, शहरात सात उद्याने आहेत़४त्यामध्ये ३२ कर्मचारी कार्यरत असून, कर्मचाºयांची कमी असल्याने उद्यानातील खेळण्यांचे साहित्य, स्टॉल्स लावण्यासाठी बीओटी तत्त्वावर द्यावे लागणार आहे़ तसेच अमृत योजनेंतर्गत तीन उद्याने विकसित केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़ याचवेळी प्रशास ठाकूर यांनी लेखी पत्र देऊन नवीन सुधारणा, योगासाठी संस्थेला जागा देण्याची मागणी केली़शासनाकडून निवृत्ती वेतन अदा करावे४सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर निवृत्तीवेतन धारकांसाठी दरमहा ६़५ कोटी रुपये खर्च होतो़४तेव्हा नगर परिषद कर्मचारी व मनपाचे कर्मचारी, कर निर्धारक यांच्या सेवानिवृत्ती वेतनासाठी अनुदान देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी मागणी सभापती सुनील देशमुख, सभागृह नेते भगवान वाघमारे यांनी केली़४त्यावर आयुक्त रमेश पवार यांनी हा प्रस्ताव मंजूर केला़ या सभेत भाजपाच्या गटनेत्या मंगल मुदगलकर, राकाँच्या गटनेत्या चाँद सुभाना जाकेरलाला, शिवसेनेचे गटनेते चंद्रकांत शिंदे, डॉ़ विद्या पाटील, डॉ़ वर्षा खिल्लारे, अनिता सोनकांबळे, विकास लंगोटे, एस़एम़ अली पाशा, अतुल सरोदे, इम्रान हुसेनी, सभापती महेमूद खान आदींनी चर्चेत सहभाग घेतला़
परभणी :१ हजार ८७ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:52 AM